फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचा सन्मान:भीमराव पाटोळे यांना समाजरत्न पुरस्कार; अण्णा भाऊ साठेंचे साहित्य संवाद आणि संघर्षाचे प्रतीक

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचातर्फे ज्येष्ठ साहित्यिक भीमराव पाटोळे यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, "संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे संतत्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, स्वातंत्र्याचा जागर करत बहुसंस्कृतीत एकात्मता जागविणारे साहित्य अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केले." डॉ. सबनीस यांनी पुढे सांगितले की अण्णा भाऊंच्या साहित्यकृती संवाद आणि संघर्षाच्या प्रतीक आहेत. बहुसंस्कृतीचे आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्या साहित्यकृतींमध्ये होती. त्यांचे कर्तृत्व देश-धर्म-पंथाच्या सीमा ओलांडून विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे होते. पुरस्कार स्वीकारताना भीमराव पाटोळे म्हणाले, "दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती या चमत्कार आहेत. त्यांना भारतरत्न हा किताब मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे." कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू आणि विशाला पाटोळे मंचावर उपस्थित होते. शाल, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. दीप्ती पाटोळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रमोद आडकर यांनी तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भीमराव पाटोळे लिखित 'ना खेद ना खंत' या पुस्तकावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात बाळासाहेब शिवरकर, ॲड. दीपक मानकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले आणि अजय पाटोळे यांचा सहभाग होता.

Aug 2, 2025 - 06:21
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow