मालेगाव ब्लास्ट - ATS च्या माजी PI चा गौप्यस्फोट:सरसंघचालकांना अटक करण्याचे होते आदेश; भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा होता दबाव

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते, असा गौप्यस्फोट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या एका माजी इन्स्पेक्टरने केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. महबूब मुजावर म्हणाले- भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी भागवतांना अटक करायची होती. त्यासाठी माझ्यावर मोठा दबाव टाकण्यात आला. माझ्याकडे या दाव्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. आता या प्रकरणातील सर्व 7 आरोपी निर्दोष सुटलेत. यामुळे एटीएसचे बोगस काम उघड झाले. ते म्हणाले- भगवा दहशतवाद नव्हता. सर्व काही बनावट होते. मी कुणाच्याही मागे गेलो नाही, कारण मला वास्तव माहिती होते. मोहन भागवत सारख्या व्यक्तीला पकडणे माझ्या क्षमतेबाहेर होते. मुजावर म्हणाले, या निर्णयामुळे एका बोगस अधिकाऱ्याच्या बोगस तपासाचा पर्दाफाश झाला. एटीएसने त्यावेळी कोणती चौकशी केली आणि का केली हे मी सांगू शकत नाही, परंतु मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार व आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सारख्या व्यक्तींविषयी काही गोपनीय आदेश देण्यात आले होते. हे सर्व आदेश असे नव्हते की कोणीही त्यांचे पालन करू शकेल. 31 जुलै- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने गुरूवारी साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात 7 मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता. पीडितांचे वकील शाहिद नवीन अन्सारी म्हणाले- आम्ही एनआयए न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू. या प्रकरणात तपास संस्था आणि सरकार अपयशी ठरले आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 100 जण जखमी झाले होते. सुमारे 17 वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा. न्यायाधीश लाहोटी म्हणाले की, स्फोट झाला होता, परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झाले नाही. मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झाले नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झाले नाही. या प्रकरणाचा निर्णय 8 मे 2015 रोजी देण्यात येणार होता, परंतु त्यानंतर न्यायालयाने तो 31 जुलैपर्यंत राखीव ठेवला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. 2011 मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने 2016 मध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात 3 तपास संस्था आणि 4 न्यायाधीश बदलले आहेत. मृतांना आरोपत्रात दाखवले जिवंत मेहबूब मुजावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मोहन भागवत यांना ताब्यात घ्या असे आदेश मला मिळाले होते. हिंदू दहशतवाद ही थेअरी पूर्णतः खोटी होती. भागवत यांना पकडून हा स्फोट हिंदू दहशतवाद असल्याचे सिद्ध करायचे होते. ही थेअरी सिद्ध करण्यासाठीच माझा या प्रकरणाच्या तपासात सहभाग करण्यात आला होता. संशयितांपैकी संदीप डांगे व रामजी कलसंगरा यांची हत्या झाली होती. पण त्यानंतरही आरोपपत्रात त्यांना जिवंत दाखवण्यात आले होते. ते मृत असतानाही मला त्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचे आदेश दिले होते. पण मी या गोष्टीचा विरोध केला. चुकीचे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण मी निर्दोष सुटलो. आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन हिंदू दहशतवाद ही थेअरी प्रत्यक्षात होती का? हे सांगायला हवे. एटीएसची चुकीची कामे उघडी पडली मेहबूब मुजावर यांनी यावेळी मालेगाव स्फोटातील आरोपी निर्दोष सुटल्यावर आनंदही व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाल्याचा मला आनंद आहे. त्यात माझेही छोटे योगदान आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे एटीएसमध्ये होणारी चुकीची कामे उघडी पडली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरूवातीला एटीएसच्या हातात होता. कालांतराने तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. मुजावर हे 29 सप्टेंबर 2008 साली या स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसचा भाग होते. हे ही वाचा... मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना विशेष NIA कोर्टाने का सोडले?:संशयाचा लाभ, अयोग्य पंचनामा , फिंगरप्रिंटचा अभाव; कोर्टाने नोंदवलेले 14 मुद्दे मुंबई - मुंबई स्थित एनआयएच्या विशेष कोर्टाने गुरुवारी महाराष्ट्रासह अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केली. ही सुटका करताना कोर्टाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांचे चांगलेच कान टोचले. तपास यंत्रणांना आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले. त्यामुळे कोर्ट केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देणार नाही, असे कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले. कोर्टाच्या या निकालामुळे देशातील एक महत्त्वाचा खटला हातावेगळा झाला आहे. वाचा सविस्तर

Aug 2, 2025 - 06:21
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow