डोंगरकडा येथील ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित:​​​​​​​कार्यारंभ आदेशामध्ये अनियमितता केल्याचा आरोप, गावकऱ्याचे उपोषण मागे

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ग्रामसेवक डी. के. लोखंडे यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे यांनी शुक्रवारी ता. १ काढले आहेत. या कारवाईनंतर गावकऱ्याने सुरु केलेले उपोषण मागे घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरकडा येथील ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामसेवक डी. के. लोखंडे यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार एन. एस. घळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र पदभार दिल्यानंतरही त्यांनी ४४ लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले होते. यामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप गावकऱ्यांतून करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी रोहन पंडीत यांनी ता. २८ जुलैपासून जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनामध्ये मागील दोन दिवसांत रोहन यांच्या प्रकृती बिघडली होती. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी ता. १ उपोषणस्थळीच त्यांच्यावर उपचार सुरु केले होते. दरम्यान, कार्यारंभ आदेशामध्ये अनियमिता प्रकरणात कळमनुरी पंचायत समितीने ग्रामसेवक लोखंडे यांना ता. २४ जूलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर लोखंडे यांनी ता. २८ जुलै रोजी खुलासा सादर केला होता. मात्र त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांचा खुलासा अमान्य करून त्यांना शुक्रवारी ता. १ निलंबीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे यांनी काढले आहेत. त्यानंतर मुंडे यांनी उपोषणकर्ते रोहन पंडीत यांची भेट घेऊन कारवाईचे लेखी पत्र सादर केले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी हिंगोलीचे प्रभारी गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांची उपस्थिती होती

Aug 2, 2025 - 06:21
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow