शेतकरी, कामगार असेपर्यंतच महाराष्ट्र आपल्या हातात:संजय राऊत यांचा इशारा; फडणवीस कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र भोगत असल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून सत्ताधारी महायुतीवर कडाडून हल्ला चढवला. आज महाराष्ट्रात शेतकरी व कामगार हे दोघेही संकटात आहेत. हे दोघे आहेत तोपर्यंतच महाराष्ट्र आपल्या हातात आहे आणि हेच या सरकारला नको आहे, असे ते म्हणालेत. कष्टकऱ्यांच्या कष्टामुळेच देवेंद्र फडणवीस आजचा महाराष्ट्र भोगत आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचा आज 78 वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह संजय राऊत उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राऊत यांनी उपरोक्त घणाघात केला. ते म्हणाले, आज या राज्यात शेतकरी आणि कामगार हे दोघेही संकटात आहे. हा महाराष्ट्र गौतम अदानींनी निर्माण केला नाही, हा महाराष्ट्र अंबानींनी निर्माण केला नाही. हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण केला नाही. मुंबईसह महाराष्ट्र जो स्थापन झाला, तो फक्त गिरणी कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि त्यांचा लालबावटा सर्वात पुढे होता. स्वातंत्र्याच्या लढ्यात भाजप नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही नव्हता. कुणीही नव्हते. महाराष्ट्राच्या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, कॉम्रेड एन डी पाटील किती नावे घ्यायची. अख्खा रायगड जिल्ह्यातील कष्टकरी समाज महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वांसोबत होता. म्हणून आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांना भोगता येत आहे. माझे आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक खास नाते आहे. मी रायगड जिल्ह्याचा आहे. ज्या जिल्ह्यात हा पक्ष सर्वाधिक रुजला. त्या जिल्ह्यात माझा जन्म झाला. त्या तालुक्यात माझे शिक्षण झाले. अजूनही मी त्या गावाला जातो. मी माझ्या जन्मापासून पाहतो की, शेतकरी कामगार पक्ष व त्यांचे कार्यकर्ते आणि आता चित्रलेखापर्यंत मी नेहमी सर्वांची माहिती घेत असतो की, तालुक्यात शेकापचे काय चालले आहे? आज लाल बावटा हातात घेतला की तुम्ही नक्षलवादी मी एवढेच सांगेन की, शेतकरी व कामगार जोपर्यंत या महाराष्ट्रात टिकवून ठेवू, तोपर्यंत हा महाराष्ट्र आपल्या हातात राहील. आणि या आजच्या सरकारला तेच नको आहे. आपण लढणारे आहोत, शेतकरी लढतो, कामगार लढतो. तो जिवाची परवा करत नाही. तो स्वाभिमानी आहे. पण आज गेल्या 5 महिन्यांत या महाष्ट्रातील साडेपाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतोय आपण? आम्ही लढतो, पण सरकार काहीच करत नाही. आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो. आता तर तुम्ही हातात लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी समजून तुरुंगात टाकले जाईल अशा प्रकारचा कायदा आणण्यात आला आहे. तुम्ही सरकारच्या विरोधात बोललात की, तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकले जाईल. तुम्ही सामाजिक आंदोलनात उतरलात, सरकारला प्रश्न विचारलात की, तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकले जाईल. काय असतो अर्बन नक्षलवाद? मला माहिती आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो. आज खेड्यापाड्यात, आदिवासी पाड्यांवर, जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे, तो कॉम्रेड आहे. तो हातात लालबावटा घेऊन काम करतो. त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणार? उद्या शेकापच्या कार्यकर्त्यांवरही ही वेळ येऊ शकते. नरेंद्र मोदींनी अख्खा देश विकला तुम्ही कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही व राष्ट्रद्रोही आहात. पण नरेंद्र मोदी राष्ट्रद्रोही नाही. त्यांनी देश विकला अंबानीला. लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली. आता हे लोक नवी मुंबई, तिसऱ्या मुंबईपर्यंत आलेत. आपल्याला सावध राहिले पाहिजे. आपल्यातील लढाऊ बाणा संपता कामा नये. या महाराष्ट्राचे राजकारण मराठी माणसाच्याच हातात राहिले पाहिजे. यासाठी आपण आता एकत्र आले पाहिजे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले. अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला. पण फक्त राज व उद्धव एकत्र येऊन चालणार नाही. त्यांच्यासोबत मराठी माणसांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वच संघटना एकत्र आल्या पाहिजे. तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार व हक्क राहील. खचून कसले जाता? निवडणुका आज येतील, उद्या परत जातील या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शेकापला निवडणुकीत यश मिळाले नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठ्या प्रमाणात यश मिळाले नाही. यामागील कारणे वेगळी आहेत. पण निवडणुकीत यश मिळाले नाही म्हणून खचता कामा नये. आपण पुढल्या लढाईसाठी सज्ज असले पाहिजे. यालाच महाराष्ट्र व मराठी माणसांचा बाणा म्हणतात. खचून कसले जाता? निवडणुका आज येतील, उद्या परत जातील, पण आपल्याला या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर खोचून उभे रहावे लागले. आजच्या शेकापच्या मेळाव्याचे महत्त्व हेच आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल मी दिल्लीत गेल्या 25 वर्षांपासून आहे. आजही तिथे महाराष्ट्राचा रुबाब आहे. आजही मराठी माणूस म्हटले की, लोकं दचकतात. त्याचे कारण, हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. हा महाराष्ट्र कधी झुकला नाही. हा महाराष्ट्र कधी वाकला नाही. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी आदी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र व मराठीवर होणारे हिंदीचे आक्रमण, उपऱ्यांचे आक्रमण थांबवले पाहिजे. मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी राहिले पाहिजे. आम्ही सर्वजण एका नात्याने सोबत आहोत. हे नाते असेच राहील. महाराष्ट्र राहिला, तर महाराष्ट्र धर्म राहील, मराठी माणूस राहील. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल हे सेनापती बापट यांनी सांगितले आहे, असेही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

Aug 2, 2025 - 21:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow