उद्योगासाठी जमिनी देताना शेतकऱ्यांनी कंपनीत पार्टनर व्हावे:राज ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन; BJP, फडणवीसांवर टीका

उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी शेतकऱ्यांकडे कंपनीचे लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसते जमिनी विकू नये, तर जेवढे शेतकरी आहेत, तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसत्या जमिनी विकू नये. तर जेवढे शेतकरी आहेत, तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्या उद्योगांमध्ये आमची मुले तर कामाला लागतीलच. मात्र, फुकटच्या जमिनी न देता कंपनीमध्ये पार्टनर आम्हाला करा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी करावी. असे आवाहन त्यांनी केले आहे. जमिनी एकदा हातातून गेल्या तर आपल्या हातात काहीही राहणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसे झाले नाही तर याच रायगड मध्ये लवकरच अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याला अमराठी लोकांचा विळखा पडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे . मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी शिकवता येईल? याचा विचार करतोय महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल? याचा विचार करतोय. महाराष्ट्रात येणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी कशी येईल? याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही. महाराष्ट्राचा मराठी माणूस, महाराष्ट्राचा भूमिपुत्र याचा विचारच होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याचे सर्वात विदारक आणि भीषण स्वरूप रायगड जिल्ह्यात दिसून येत असल्याचे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का? या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. मात्र गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरात मध्ये गेले आहेत. आज हिरा उद्योग देखील गुजरात मध्ये गेला असल्याचे राज यांनी म्हटले आहे. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याचे प्रेम असते. मग बोललो तर संकुचित कसा? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही. तर महाराष्ट्रात का आणत आहात? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला. एकदा भाषा संपली आणि जमिनी गेल्या तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही स्थान नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. गुजरात बाहेरील व्यक्तीला तेथे जमिन विकत घेता येत नाही गुजरात मध्ये शेतीची जमीन गुजराती कायद्यानुसार गुजरात बाहेरील व्यक्तीला विकत घेता येत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोनी गुजरातला गेला तर त्याला शेत जमीन विकत घेता येत नाही. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे आहेत. त्यांच्या राज्यातील शेत जमीन या देशातला कोणताही नागरिक विकत घेऊ शकत नाही. यावरुन राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. फेमा नावाच्या कायद्यांतर्गत रिझर्व बँकेकडून विशेष परवानगी घेऊनच गुजरातमध्ये जमीन विकत घ्यावी लागते. प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत असतो. प्रत्येक जण आपल्या राज्याचे माणसांचा विचार करतो. मग तो आम्ही का नाही करावा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. कुंपणच शेत खात आहे रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या जात आहेत. त्या कुठे चालल्या? काय चाललंय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. जमिनीचे व्यवहार देखील आपलेच लोक करत आहेत. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्योगधंदे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन चालल्या आहेत. मात्र त्या उद्योगधंद्यांमध्ये बाहेरचे माणसे येत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. आज शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर मी आलो आहे. मात्र यातील शेतकरी देखील कामगार यांची बरबादी होत आहे. असे असताना मग शेतकरी कामगार पक्षाचा काय उपयोग? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Aug 2, 2025 - 21:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow