सिल्लोडमध्ये प्रलंबित 300 फेरफार, 20 शेतरस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी:सिल्लोडमधील 134 गावांना देताहेत महसूलची 11 पथके भेट‎

महसूल प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा निपटारा व्हावा म्हणून राज्यात विशेष महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या विशेष महसूल सप्ताहात अनेक लोकोपयोगी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यात तालुक्यातील ३०० फेरफारांची प्रलंबित, तर २० शेतरस्त्यांची प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. यासाठी महसूलची ११ पथके तयार करण्यात आली असून ही पथके तालुक्यातील १३४ गावांमधील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. शुक्रवारी (दि. १) तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांचे हस्ते महसूल सप्ताहाचे उद््घाटन झाले. याशिवाय महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व विविध लाभार्थींना प्रमाणपत्र आणि शासकीय योजनेतील मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. बुधवारी (दि. ६) शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करून पुढील निर्णय घेतला जाईल. यासाठी महसूल अधिकाऱ्यांसह इतर शासकीय कार्यालयाच्या विभागातील अधिकारीही या विशेष महसूल सप्ताहात सहभागी होणार आहेत. गुरुवारी (दि. ७) एमसेंड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्व पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ^मागील अनेक वर्षांपासून सिल्लोड तहसील कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. यात फेरफार क्षेत्र असते, पाणंद रस्ते आदी अनेक प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी या विशेष महसूल सप्ताहाचा फायदा होईल. काही प्रकरणांबाबत जागेवर निर्णय देण्याचे नियोजन आहे. विद्यार्थी व नागरिकांसाठी लागणारी प्रमाणपत्रे ही जागेवरच दिली जातील. -सतीश सोनी, तहसीलदार

Aug 2, 2025 - 21:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow