‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा लासूर स्टेशनमध्ये झाला समारोप:महिनाभर अभियान, आजवर 7 हजार झाडांचे वृक्षारोपण‎

लासूर स्टेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा समारोप गुरुवारी लासूर स्टेशन येथे झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर तालुक्यात हे अभियान राबवण्यात आले. आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागील महिनाभर हे अभियान चालवले. आरापूर परिसरातील वनविभागाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, त्यांच्या पत्नी फिलोमिना चाऊस, आमदार बंब यांचे बंधू संदेश बंब, त्यांच्या पत्नी शितल बंब उपस्थित होते. सरपंच मीनाताई संजय पांडव, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील जाधव, ग्रामपंचायत सदस्य सोपानराव बोरकर, प्रकाश कोकरे, अशोक सौदागर, कल्याण पवार, विकी मढीकर, माजी उपसरपंच गणेश व्यवहारे, संतोष काळे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा, चाटे पब्लिक स्कूल, जॉर्ज पब्लिक स्कूल, राजमाता हायस्कूल, स्वामी समर्थ हायस्कूल, श्रीगणेश विद्यालय, राणाजी पब्लिक स्कूल आणि शिवना पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनीही उत्साहात सहभाग घेतला होता. जंगलातील वातावरण पाहून विद्यार्थ्यांना निसर्गाचा आनंद घेता आला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ‘वनीकरण’ व ‘समृद्धी’कडून रोपे अभियान सुरू करताना ३ हजार झाडे लावण्याचा निर्धार होता. मात्र समाजातून मिळालेल्या प्रतिसादामुळे ७ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यांच्या पत्नी कविता चव्हाण यांनीही सुरुवातीपासून सहभाग घेतला. वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभाग आणि समृद्धी महामार्ग यंत्रणेकडून रोपे मिळाली.

Aug 2, 2025 - 21:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow