पोलिसांनी वकिलाला अर्ध्या कपड्यावर घरातून फरपटत नेले:वकिलांचे काम बंद आंदोलन, सांगलीतील घटनेने खळबळ

सांगली जिल्ह्याच्या विटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मध्यरात्री पोलिसांच्या एका पथकाने एका वकिलाच्या घरात घुसून त्यांना पोलिस ठाण्यात नेले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी मात्र, संबंधित व्यक्ती शासकीय कामात अडथळा आणत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांनी एका गावगुंडाप्रमाणे वकिलांना फरफटत नेल्याने वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विटा शहरात पोलिसांनी एका वकिलाला केलेल्या मारहाणीप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून काही पोलिस एका विशिष्ट ठिकाणी तडीपार गुंडांच्या शोधात रात्री-अपरात्री येत होते आणि फोटो काढत होते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने वकील विशाल कुंभार यांनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा पोलिस कर्मचाऱ्यांसह वकिलाच्या घराजवळ येऊन वाद घातला. या घटनेनंतर पोलिसांनी वकिलाला घरातून अर्ध्या कपड्यातच घरातून बाहेर खेचत पोलिस ठाण्यात नेले. या घटनेमुळे वकील संघटनांकडून पोलिसांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. विटा येथील वकिलाला पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी विटा पोलिसांनी 'शासकीय कामात अडथळा' आणल्याचा आरोप करत वकिलावर गुन्हा दाखल केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व वकिलांनी एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले. तसेच त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी एका गावगुंडाप्रमाणे वकिलांना फरफटत नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे वकील संघटना अधिक संतप्त झाल्या असून, पोलिसांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow