दिव्य मराठी इम्पॅक्ट:फुलंब्रीत १५७ जणांचा ८ वर्षांनंतर घर बांधण्याचा मार्ग झाला मोकळा; कृती आराखडा मंजूर झाल्याचा फायदा
प्रतिनिधी | फुलंब्री शहराचा कृती आराखडा नुकताच मंजूर झाला असून, फुलंब्री शहराला विकासाची गती मिळणार आहे. तसेच बनावट एनए करून विकलेल्या प्लॉट धारकांना आता बांधकाम परवानगी मिळणार असल्याने गट क्रमांक १७ मधील जवळपास १५७ प्लॉट धारकांनी रविवारी आमदार अनुराधा चव्हाण तसेच अतुल चव्हाण यांची भेट घेत आभार मानले. २०१७ मध्ये फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील हरिओम नगरमध्ये बनावट सिक्के मारून एनए प्लॉट असल्याची संबंधित बिल्डर व डेव्हलपरने १५७ प्लॉट धारकांची फसवणूक करून हे प्लॉट विकले होते. या प्रकरणाला ‘दिव्य मराठी’ने वाचा फोडली होती. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनुराधा चव्हाण यांनी हा विषय मांडला होता. यावेळी बावनकुळे यांनी सदरील तलाठी व मंडळाधिकारी यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर आमदार अनुराधा चव्हाण यांनी या प्लॉट धारकांना नियमाप्रमाणे तुमचे काम करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आता कृती आराखडा मंजूर झाला असून, सदरील प्लॉट यलो झोनमध्ये गेले आहेत.

What's Your Reaction?






