स्टंटबाजी करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप घेतली:रोहित पवार, विजय वडेट्टीवार यांची प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी (रॅपिडो) वर कारवाईचा दिखावा केला, पण नंतर त्याच कंपनीकडून त्यांच्या मुलाने स्पॉन्सरशिप घेतल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी केला आहे. रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे, या घटनेवरून सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, 'स्टंटचे 'प्रताप' करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप मिळवली.' त्यांनी सरनाईक यांच्यावर इव्हेंटसाठी निधी कसा उभा करायचा, याचा 'डेमो' महाराष्ट्राला दाखवल्याचा आरोप केला. आधी एका खासगी ॲपवरून बाईक बुक करून, नंतर त्याच बाईक चालकाला पकडून कारवाईचा स्टंट करायचा, आणि नंतर त्याच कंपनीकडून इव्हेंटसाठी पैसे मिळवायचे, ही आयडिया किती छान आहे, असा टोला त्यांनी लगावला. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांना निधीसाठी अशाच प्रकारची स्टंटबाजी करावी लागेल, असेही त्यांनी म्हटले. 'हा मंत्रीपदाचा गैरवापर' - रोहित पवार आमदार रोहित पवार यांनीही X वर पोस्ट करून सरनाईक यांच्यावर टीका केली. त्यांनी या घटनेला 'डबल_धमाका' असे संबोधले. 'रॅपिडो बाईक आली.. खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली.. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली.. मंत्र्यांनी ‘रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळाली,' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. हे सरकार जनतेसाठी नाही, तर स्वतःसाठी काम करते, हे यातून स्पष्ट होते. हा मंत्रीपदाचा गैरवापर आहे का, असा सवाल करत त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला. परिवहन मंत्र्यांचा #डबल_धमाका रॅपिडो बाईक आली.. त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली... बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली... मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली... यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट… pic.twitter.com/617RzS6OWE नेमकी घटना काय? 2 जुलै 2025 रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत एका अनधिकृत रॅपिडो बाईक टॅक्सीला रंगेहात पकडले होते. राज्यात कोणत्याही बाईक टॅक्सी ॲपला परवानगी नसताना, त्या धावत असल्याचा आरोप करत सरनाईक यांनी कारवाईचे संकेत दिले होते. राज्याने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले असून, त्यानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या कंपन्यांना परवानगी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, ज्या रॅपिडोवर कारवाईची भाषा केली होती, त्याच कंपनीकडून त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याने स्पॉन्सरशिप घेतल्याचे उघड झाल्याने आता हा वाद पेटला आहे.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow