विदर्भातील खेळाडूंनी गाजवली हिंगोलीतील मॅरेथॉन स्पर्धा:प्रणाली शोगोकार, ऋतीका नंदेवार, स्नेहा चौधरींनी मिळविले यश, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त स्पर्धा
हिंगोलीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शनिवारी ता. ३१ आयोजित मॅरेथॉन स्पर्धा विदर्भातील खेळाडूंनी गाजवली. या स्पर्धेत प्रणाली शोगोकार, ऋतीका नंदेवार, स्नेहा चौधरी यांनी यश मिळविले आहे. येथील महात्मा गांधी चौकातून या स्पर्धेला सुरवात झाली. तीन किलो मिटर अंतर धावण्याच्या स्पर्धेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, कैलास काबरा, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील भुक्तर, भरत पहेलवान चौधरी, सदाशिव सुर्यतळ, शाम खंडेलवाल, सुनीताताई मुळे, रजनी पाटील, रणजीत पुरोहित, हमीद प्यारेवाले, बाळू बांगर, रमेश गंगावणे, आर. एम. व्यवहारे, नितीन मोरे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत मराठवाडा व विदर्भातील सुमारे 120 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. महात्मा गांधी चौकातून सुरु झालेली स्पर्धा इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक, हॉटेल गणेश इन, लक्ष्मी लाईफ केअर हॉस्टीपल, छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोस्ट ऑफीस, जवाहर रोड मार्गे पुन्हा महात्मा गांधी चौकात समाप्त झाली. तीन किलो मीटर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम प्रणाली शेगोगार (शेगाव), द्वितीय ऋतीका नंदेवार (वाशीम), तृतीय स्नेहा चौधरी (वाशीम), चौथे पारितोषीक वर्षा कदम (परभणी), पाचवे पारितोषीक परिमाला बाबर (परभणी) यांच्यासह गौरी भोसले (पूर्णा), पल्लवी मुटकुळे (हिंगोली), पुजा जगताप (हिंगोली) यांनी यश मिळविले. या स्पर्धेकांना रोख पारितोषीके देण्यात आली. पंच म्हणून नितन मोरे, ए. व्ही. लोळेवार यांनी काम पाहिले.

What's Your Reaction?






