वकिलांवरील हल्ले, समन्स विलंबावर उपाययोजन करा:पोलिस अधीक्षकांना भेटून वकिलांनी दिले निवेदन‎

अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये वकिलांवर होणारे जीवघेणे हल्ले, आरोपींना समन्स व वॉरंट बजावण्यात होणारा विलंब, तसेच पोलीस यंत्रणेच्या वागणुकीबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी यासंदर्भात शनिवारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची वकिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये पोलिस यंत्रणेकडून होत असलेली दिरंगाई, पोलीस स्टेशन व भरोसा सेल येथे वकिलांना येणाऱ्या समस्या, न्यायालय परिसरातील पोलीस सुरक्षा, कोर्ट ऑर्डलींची कार्यशैली यासह विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक घार्गे यांच्याकडे वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत तातडीने कारवाईची मागणी केली. तसेच, आरोपींना न्यायालयात वेळेवर हजर करण्यासाठी समन्स व वॉरंट बजावणी अधिक कार्यक्षम करण्याबाबत सूचना दिल्या. पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांना भेटून वकिलांनी निवेदन दिले.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow