"कृषी यांत्रिकीकरणाने बदलत्या हवामानावर मात करणे शक्य'
राहुरी दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानाला तोंड देणे अवघड होत असले तरी शेतकरी बांधवांनी न डगमगता या आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करावे हे स्पष्ट करत कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जागतिक हवामान बदलावर आपण मात करू शकतो, असे प्रतिपादन कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.रवींद्र बनसोड यांनी केले. अखिल भारतीय समन्वयीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी व कृषि महाविद्यालय, हाळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठातील विकसित आधुनिक कृषि अवजारे व यंत्रे, ऊस लागवड तंत्रज्ञान,ऊस शेतीसाठी उपयुक्त यांत्रिकीकरण, ड्रोन-ऊस शेतीसाठी वरदान, खोडवा ऊस व्यवस्थापनाकरीता उपयुक्त यांत्रिकीकरण,सूक्ष्म अन्नद्रव फुले मायक्रो ग्रेड या विषयांवर कृृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांंनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेतकरी, कृषी महाविद्यालय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हाळगाव येथील कृषी महाविद्यालयात ऊस लागवड तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रम झाला.

What's Your Reaction?






