स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून विद्यार्थिनींचा अनोखा सलाम:राखी म्हणजे फक्त बंध नव्हे, तर समाजासाठी समर्पणाचा संदेश :मनपा आयुक्त यशवंत डांगे‎

शहराच्या स्वच्छतेसाठी मेहनत घेणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण विशेष पद्धतीने साजरा केला. या उपक्रमात विद्यार्थिनींनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्यावरील आपुलकी आणि आदरभाव व्यक्त केला. या प्रसंगी कर्मचाऱ्यांनीही आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले होते. कार्यक्रमास मनपा आयुक्त यशवंत डांगे, संस्थेचे सचिव र. धों. कासवा, विश्‍वस्त राजेंद्र चोपडा, मनसुखलाल पिपाडा, सचिन डागा, शिवनारायण वर्मा, विनोद कटारिया, मुख्याध्यापक दत्तात्रय कसबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, आर्किटेक असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत देवी आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त डांगे म्हणाले, स्वच्छता ही केवळ पालिकेची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक नागरिकाची बांधिलकी आहे. या मुलींच्या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. समाजात त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे. सविता रमेश प्रशालेने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. आज विद्यार्थिनींनी कर्मचाऱ्यांना राखी बांधून जो आत्मीयतेचा धागा गुंफला आहे, तो सामाजिक सलोखा आणि आपुलकी वाढवणारा आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कार्य सामान्य वाटले तरी त्यामागे खूप मेहनत आणि समर्पण असते. हे विद्यार्थिनींनी ओळखले हे विशेष आहे. संस्थेचे सचिव कासवा म्हणाले, विद्यार्थ्यांत सामाजिक भान निर्माण व्हावे या हेतूने आम्ही विविध उपक्रम राबवतो. रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाचा असा सामाजिक वापर केल्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानात मर्यादित राहत नाहीत, तर वास्तव आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी त्यांना मिळते. महापालिकेचे कर्मचारी म्हणजे आपल्या शहराचे रक्षक. त्यांच्याशी संवाद, सलोख्याचा धागा आणि कृतज्ञता व्यक्त करणं ही शिक्षण प्रक्रियेचा एक भाग आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, कृतज्ञता आणि जबाबदारी निर्माण होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक योगिता गांधी यांनी केले. यावेळी राजेंद्र चोपडा यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीराम खाडे यांनी, तर आभार जयश्री कोदे यांनी मानले.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow