पुण्यात विचित्र अपघात:खड्ड्यात दुचाकी घसरली अन् वृद्धाचा कारखाली चिरडून मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात एक अंगाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला आहे. खड्ड्यांमुळे गाडी स्लीप झाली आणि चालक मागून आलेल्या कारच्या चाकाखाली आला. यामध्ये 61 वर्षीय वृद्ध जगन्नाथ काळे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात औंधमधील गजबजलेल्या राहुल हॉटेलजवळ घडला. जगन्नाथ काळे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना गाडी स्लीप झाली त्यामुळे ते तोल जाऊन रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुण्यात वारंवार अशा प्रकारे खड्ड्यांमुळे जीवितहानी होताना दिसत आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ जबाबदारी स्वीकारून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Aug 2, 2025 - 06:21
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow