जगातील ७४ देशांमध्ये मराठी भाषिक, १७ देशांत संवर्धनाच्या योजनाही सुरू:मराठी भाषा विभाग सचिव डॉ. कुलकर्णींची माहिती

प्रतिनिधी | सोलापूर मराठी ही केवळ राज्यभाषा नाही तर अभिजात भाषा आहे. जगभरातील ७४ देशांमध्ये मराठी भाषिक आहेत आणि १७ देशांमध्ये या भाषेच्या संवर्धनासाठी अनेक योजना सुरू आहेत. भाषेचे जतन आणि संवर्धन हे प्रत्येक भाषाप्रेमीचे कर्तव्य असल्याचे राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी येथे सांगितले. प्रिसिजन फाउंडेशन आयोजित वाचन अभियानात रविवारी ते बोलत होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. "एखादा शासकीय अधिकारी कवी किंवा साहित्यिक असू नये का? हा प्रश्न उपस्थित करत डॉ. कुलकर्णी म्हणाले, “अशा अधिकाऱ्यांची संख्याच कमी आहे. ही आपल्या समाजाची उणीव आहे. ” केंद्र सरकारच्या भाषिणी अ‍ॅपचा उल्लेख करत, त्यांनी जुन्या शब्दसंपत्तीच्या संवर्धनावर भर दिला. "दिवाळी अंक १९०९ पासून सुरू आहेत. विश्वकोश हा मराठी भाषेचा मानबिंदू आहे. ही परंपरा जपणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोलापूर हे फक्त चादरीचे नव्हे, तर वाचणाऱ्यांचे गाव व्हावे. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा युनिक फिचर्सचे संचालक आनंद अवधानी यांनी केले. माधव देशपांडे यांनी आभार मानले.

Aug 4, 2025 - 12:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow