आश्रमशाळेच्या भिंतीचा अपघात:खासदार वानखडे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जखमी विद्यार्थिनींची रुग्णालयात घेतली भेट

चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील आदिवासी आश्रम शाळेत दुर्दैवी घटना घडली. पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. शनिवारी दुपारी खासदार बळवंतराव वानखडे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थिनी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थिनींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी उपस्थित शिक्षकांकडून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. त्यांनी डॉ. रावत यांना मुलींच्या आरोग्याबाबत आणि प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. नेत्यांनी विद्यार्थिनींच्या नातेवाईकांशी बोलताना या प्रकरणात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती दयाराम काळे, नामदेवराव तनपुरे, सहदेवराव बेलकर, कैलाशराव आवारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एहतेशाम नबील, अमोल चिमोटे, राहुल येवले, अमोल बोरेकार, संजय बेलकर, राहुल गाठे, किशोर झारखंडे, राजेश काळे, सुधीर रहाटे, पोपट घोडेराव, जय घोरे आणि इतर कार्यकर्तेही या वेळी हजर होते.

Aug 2, 2025 - 21:26
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow