कापड दुकानातून 6 मिनिटांत चोरी करुन पसार:चितळे रोडवर बंद पोलिस चौकीजवळील घटना;‎अडीच लाख लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद‎

दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी चितळे रस्त्यावरील बंद असलेल्या पोलिस चौकीजवळ डी. चंद्रकांत या कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली अडीच लाखांची रोकड ६ मिनिटांत लंपास केली. तर, तेथून जवळच असलेल्या हॉटेल प्यासा येथेही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी डी. चंद्रकांत दुकानाचे लक्ष्मण राजाराम दुलम (वय ५८, रा. सातभाई मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ४.२८ वाजता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कटावणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले. त्यातील दोघे दुकानाच्या बाहेर थांबले व एकाने आत प्रवेश करून दुकानाच्या काउंटरच्या ड्रॉवरचे लॉक तोडले. त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन ४.३४ वाजता म्हणजे अवघ्या ६ मिनिटांत पोबारा केला. तेथून जवळच असलेल्या हॉटेल प्यासा येथेही चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. मात्र, आतील बाजूस असलेला दरवाजा बंद असल्याने व त्याचे लॉक तोडता न आल्याने चोरीचा प्रयत्न फसला. डी. चंद्रकांत दुकानातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानुसार पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. चौकी सुरू करण्याकडे पोलिसांनी केले दुर्लक्ष चितळे रस्त्यावर एकाच जागेत दोन पोलिस चौक्या आहेत. या दोन्ही चौक्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. चौकी सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी, यासह स्नेहालय, सावली, वूमन्स डेव्हलपमेंट, हरियाली अशा विविध संघटनांनी पोलिस अधीक्षकांना निवेदने दिली आहेत. २५ दिवसांपूर्वीही नव्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दखल घेतली न गेल्याने चौकीच्या समोरच्याच बाजूला असलेल्या दुकानात चोरट्यांनी डाव साधला.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow