आपबिती:चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात जाऊन कलंडली, 1 जण ठार, भडगाव- एरंडाेल भरधाव बसचा अपघात, 50 प्रवासी जखमी‎

भडगावकडून एरंडोलकडे जाणारी एसटी बस, चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल नाल्यात जावून उलटली. यात बसमधील ५५ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले. हा अपघात भडगाव-एरंडोल मार्गावर एरंडोल पासून दीड किमी अंतरावरील नायरा पेट्रोल पंपाजवळील वळणावर शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास झाला. गुलाब तुळशीराम महाजन (वय ५५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एरंडोल आगाराची भडगाव-एरंडोल बसही क्र. एमएच २० बीएल ३४०२ ही एरंडोलकडे येत होती. तेव्हा एसटीचा चालक ज्ञानेश्वर भास्कर चव्हाण याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने बस चालवल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खोल नाल्यात उलटली. या अपघातात बसधील प्रवासी गुलाब तुळशीराम महाजन अपघातानंतर तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने बस नाल्यातून बाहेर काढण्यात आली.घटनेची माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.आमदार अमोल पाटील यांनी ग्रामीण रूग्णालय येथे धाव घेत जखमी रूग्णांची चौकशी केली. यावेळी जखमींसह नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. अपघातात जखमींना प्रत्येकी ५०० रूपये तात्काळ रोख मदत दिली.तसेच मृत व्यक्तीच्या वारसाला १० लाख रुपये मदत जाहिर करण्यात आली. रा.वडगाव ता.पाचोरा यांचा बस खाली दबल्या जाऊन जागीच मृत्यू झाला. तर बसमधील ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले. घडली. जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. तसेच वाहक खटाबाई मोरे या सुद्धा जखमी झाल्या. जखमी प्रवाशांमधील २७ प्रवाशांना अधिक मार लागल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व अन्य खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर एरंडोल येथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. बस उलटल्यानंतर घटनास्थळी हाहाकार उडाला होता. परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करत होतो. गाडीत गर्दी असल्याने चालकाच्या शेजारीच उभा होतो. तेव्हा चालकाला डूलकी येत असल्याने बस हेलकावे घेत होती. वळणावर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले व बस नाल्यात जाऊन कलंडली. त्यामुळे प्रवाशांनी आक्रोश केला. कसा बसा बसच्या खिडकीतून बाहेर पडलो. व गावात अपघाताबद्दल कळवले. देव बलवत्तर म्हणून वाचलो. -सोहम दीपक पाटील, खडके खुर्द

Aug 2, 2025 - 21:26
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow