औंढा नागनाथला दुसऱ्या श्रावण सोमवारी महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील भाविकांची गर्दी:दर्शनासाठी तीन ते चार तासांचा वेळ, गर्दीमुळे पहाटे दीड वाजता मंदिर उघडले

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी ता. ४ पहाटे दीड वाजता महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी असल्याने दिड वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील भाविक नागनाथच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन रांगेत पिण्याचे पाणी व साबुदाणा खिचडीचे वाटप केले जात आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. पहिल्या श्रावण सोमवारी सुमारे दिड लाख भाविक दर्शनासाठी आले होते. त्यानंतर दुसऱ्या सोमवारी ता. ४ भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने नियोजन केले होते. दरम्यान, सोमवारी ता. ४ साडेबारा वाजता मंदिरात औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दिड वाजता मंदिर खुले करण्यात आले. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळी सात वाजल्यानंतर गर्दीचा ओघ वाढला होता. त्यामुळे संस्थानचे दर्शन सभागृह गर्दीने गच्च भरल्यानंतरही पश्‍चिमद्वाराच्याही मागे रांग कायम होती. त्यामुळे दर्शनासाठी सुमारे तीन ते चार तासाचा कालावधी लागत होता. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने दानशूराच्या मदतीने पिण्याचे पाणी तसेच साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या शिवाय जमादार संदीप टाक यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नागनाथ मंदिर फुलून गेले होते. दरम्यान, महाराष्ट्रासह बाहेर राज्यातून आलेल्या भाविकांच्या मदतीसाठी संस्थानच्या कर्मचाऱ्यासोबतच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. या शिवाय मंदिराच्या परिसरात साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत सुमारे ४० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे संस्थानच्या सूत्रांनी सांगितले.

Aug 4, 2025 - 12:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow