सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला मनोहरभाई पटेल यांच्या आठवणींना उजाळा:दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उभारणीत योगदान

नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांचेही योगदान राहिले आहे. एकेकाळी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पैसा नव्हते. अशावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील, गोंदियाचे उद्योजक मनोहरभाई पटेल यांनी मदतीचा हात पुढे केला, अशी आठवण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितली. सरन्यायाधीश गवई म्हणाले, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीतून आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी केली. सुरुवातीला चार खोल्यांच्या चाळीत महाविद्यालय चालायचे. एकदा तर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नव्हते. तेव्हा दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे आदींनी उद्योजक मनोहरभाई पटेल यांच्याकडे अडचण सांगितली. पटेल यांना संस्था व पदाधिकाऱ्यांबद्दल आत्मीयता होती. त्यांनी जिव्हाळ्यातून अट टाकली की, आपण दोघे गोंदियाला येऊन माझ्याकडे जेवण केले तर मदत करू. दोघेही त्यानुसार गोंदियाला गेले व महाविद्यालयाला मदत मिळाली. अशा कठीण परिस्थितीतून महाविद्यालयाला वैभव प्राप्त झाले आहे. दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई, डॉ. कमलताई गवई आदींच्या उपस्थितीत पार पडला.

Aug 4, 2025 - 12:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow