चिकनगुनियाने अंग ठणकले; जिल्ह्यात ७ महिन्यात ८७ रुग्ण; दक्षतेचे आवाहन:संक्रमित डास चावल्यावर तीन ते सात दिवसांमध्येच लक्षणे दिसू लागतात

प्रतिनिधी | अमरावती पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये मलेरिया, डेंग्यू तसेच चिकुनगुनिया आजार डोके वर काढतात. ताप, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी ही याची लक्षणे आहेत. जिल्ह्यात जुलैपर्यंत ८९ च्या जवळपास चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या दिवसांमध्ये कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांमुळे मानवांमध्ये पसरतो. हा चिकनगुनिया विषाणूमुळे होतो आणि अचानक ताप आणि सांधेदुखी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत जी तीव्र आणि कमजोर करणारी असू शकतात. चिकुनगुनिया हा ''एडिस इजिप्ती'' डासाच्या चावण्याने पसरतो. संक्रमित डास चावल्यावर तीन ते सात दिवसांत लक्षणे दिसू लागतात. चिकुनगुनिया झाल्यास अचानक १०२ ते १०४ पर्यंत ताप येतो. मनगट, घोटासारख्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात, ज्या अनेक आठवडे टिकू शकतात. संपूर्ण शरीरात वेदना जाणवतात. पाण्याची भांडी नेहमीच झाकून ठेवा. कुंड्या, फुलदाण्यांतील पाणी नियमित बदला. घराभोवती पाणी साठू देऊ नका. चिकुनगुनियाचा त्रास लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींना होतो. पावसाळ्याच्या दिवसात रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात तापाचे रुग्ण असले, तरी डेंग्यू, मलेरिया या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. गत सहा महिन्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ जिल्हा हिवताप विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये चिकुनगुनियाचे ८७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाय योजना केल्या जात आहेत. पावसाळ्याच्या दिवसात कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कीटकजन्य आजार वाढतात. हिवताप विभागाकडून ग्रामीण भागात या संदर्भात जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉॅ. शरद जोगी यांनी दिली.

Aug 4, 2025 - 12:23
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow