रक्कम दुपटीचे आमिष; शेतकऱ्याचे 6.50 लाख लुटणारी टोळी गजाआड:म्होरक्याने चांदूर रेल्वेतून परतवाड्यात बोलावले अन् मारहाण करून लुबाडले
चांदूर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा येथील एका ४४ वर्षीय शेतकऱ्याला रक्कम दुप्पट करून देतो, अशी बतावणी करून एकाने अचलपूर नाक्याजवळ बोलावले. त्या ठिकाणी परिसरात असलेल्या त्रिवेणी संगमावर रकमेची पूजा केली. त्यानंतर साडेसहा लाख रुपयांची रक्कम घेऊन सहा ते सात जणांच्या टोळीने पळ काढला. शेतकऱ्याने प्रतिकार केला असता त्याला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ३) सायंकाळी ६ वाजता घडली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने लुटारूंचा शोध घेत मंगळवारी सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून ५ लाख १४ हजार रोखसह दहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दिलीप राऊत उर्फ शरद दिगांबर ढोके (५३, रा. शहापूर वरुड), लाला ऊर्फ मनोजकुमार फुलचंद जयस्वाल (४२) आणि गोलू ऊर्फ जयकुमार जगदीश गेडाम ( ४०, दोघेही रा. फ्रेजरपुरा, अमरावती), नीलेश देवकरण यादव (४०, रा. राजापेठ, अमरावती), प्रदीप रामराव वैराळे (४७) व शुभम गोपाल वैराळे (२६, दोघेही रा. राजना पूर्णा ता. चांदूर बाजार) यांना अटक केली आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार शरद ढोके असून, त्याने स्वत:चे नाव दिलीप राऊत (रा. अचलपूर) असे सांगून सुधाकर राऊत (४४, रा. सुपलवाडा) यांना रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष देत अचलपूर नाक्यावर बोलावले होते. दिलीप राऊत व सुधाकर राऊत यांची भेट सुपलवाडा येथील सचिन ठाकरेने घालून दिली होती. दिलीप व सुधाकर यांची अगोदर एकदा भेट झाली आहे. त्यानंतर २ जूनला शरद ढोकेने सुधाकर यांना रक्कम घेऊन त्रिवेणी संगम अचलपूर येथे बोलावले. सोमवारी सायंकाळी सचिन ठाकरेसह सुधाकर राऊत अचलपुरात दुचाकीने पोहोचले. त्यावेळी राऊत यांनी दहा लाख रुपये सोबत आणले होते. मात्र काही दगाफटका झाल्यास आपले मोठे नुकसान होईल यामुळे सुधाकर यांचा लहान भाऊ त्यापैकी साडेतीन लाख रुपये काढून घरी निघून गेला. दरम्यान साडेसहा लाख रुपये घेऊन सचिन व सुधाकर अचलपूर नाक्यावर हजर होते. काही वेळातच त्या ठिकाणी शरद ढोके ऊर्फ दिलीप आला. { उर्वरित. पान ४ २ जूनला अचलपूर येथे वाहन खरेदीसाठी आलो असताना पाच ते सहा जणांनी आपल्यासह पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण करून १० लाख रुपये घेऊन पळाल्याची तक्रार सुपलवाडा येथील सुधाकर राऊत यांनी परतवाडा पोलिसांत केली. मात्र, उलट तपासणीदरम्यान आपल्याकडील ६.५० लाख रुपये हिसकावले गेल्याची कबुली देत आपण वाहन खरेदीसाठी नाही तर पैसे दुप्पट करण्याच्या बतावणीमुळे परतवाड्याच्या त्रिवेणी संगम परिसरात आल्याचे राऊत यांनी सांगताच पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. साडेसहा लाख लुटल्यानंतर अवघ्या काही वेळातच रकमेची हिस्सेवाटणी झाली. साडेसहा लाखांपैकी ५ लाख एकट्या शरद ढोकेने ठेवले, तर अन्य एकाला ५० हजार दिले. तसेच वाहन भाडे दिले. या व्यतिरिक्त इतरांना ३ ते ४ हजार रुपये दिलेत. एकाला तर केवळ १ हजार रुपये त्याने दिल्याचे पोलिस तपासात समोर आले वाहन खरेदीच्या व्यवहाराची होती रक्कम : तक्रारदार लुटलेल्या ६.५० लाखांपैकी म्होरक्याने ठेवले पाच लाख

What's Your Reaction?






