शनिवार, रविवारीची सुट्टीमुळे शनिदर्शनाला भाविकांची गर्दी:मंदिर परिसरात आयोजित शिबिरात भाविकांनी केले रक्तदान

प्रतिनिधी | कुकाणे काल श्रावणी शनिवारी व आज रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे शनिशिंगणापुरला दोन दिवस भाविकांची मोठी गर्दी होती. रविवारी दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. श्रावणात शनिवारी, रविवारी व सोमवारी अशा सलग तीनही दिवशी भाविक शनिदेव दर्शनाला गर्दी करत आहेत. शिवालयाकडे, शिर्डीकडे येत असलेले भाविक शनिशिंगणापुरलाही दर्शनाला येत आहेत. रविवारी सकाळी जम्मूकाश्मीरातील जम्मू जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शर्मा व अंकुश शर्मा यांनी शनिशिंगणापुरला उदासी महाराज मठात पूजा, अभिषेक करून चौथऱ्यावर जावून शनिदेवास तैलाभिषेक केला. महाद्वार दर्शन रांग, चौथरा दर्शन रांगेतही दिवसभर गर्दी होती. देवस्थान महाप्रसादालय, बर्फी प्रसाद काउंटर, तेल विक्री काउंटर येथेही भाविक गर्दी करत होते. दर्शनाला आलेल्या काही भाविकांनी मंदिर परिसरात आयोजित शिबिरात रक्तदान केले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले देवस्थान जनसंपर्क कार्यालयात भाविकांच्या गर्दीवर व नियोजनावर लक्ष ठेवून होते. नंदकिशोर शर्मा व अंकुश शर्मा यांचा देवस्थान कार्यालयात देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले. शनिदेवास तैलाभिषेक करताना जम्मू भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शर्मा

Aug 4, 2025 - 12:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow