श्री व्यंकटेशा रमणा गोविंदाच्या जय घोषात बालाजी मूर्तीची मिरवणूक:श्री व्यंकटेश वरला कल्याणमनिमित्त बालाजी व पद्मावती,लक्ष्मी यांना सामुदायिक लावली हळद
प्रतिनिधी | अहिल्यानगर श्रमिक बालाजी मंदिराच्या ३२ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री निवासा गोविंदा... श्री व्यंकटेशा रमणा गोविंदा... श्रमिक निवासा गोविंदाच्या जय घोषात बालाजी उत्सव मुर्तीची मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात शहरासह सावेडी उपनगरातून मिरवणूक काढण्यात आली. उत्सव मूर्ती ची मिरवणूक नवीपेठ श्रीराम मंदिरात आरती करून कापडबाजार,दिल्ली गेट,चितळे रोड,तेली खुंट,प्रोफेसर कॉलनी,श्रमिक नगर काढण्यात आली. श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या ३२ व्या वार्षिक महोत्सव (ब्रम्होत्सव) निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी नवीपेठ श्रीराम मंदिरा पासून बालाजी उत्सव मुर्तीच्या आरतीने या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत गुंड ,विनायक गुडेवार,शरद कयादर,संतोष बीज्जा, नागेश तुम्मनपेल्ली,रवि दंडी, श्रीराम सेवा भक्त मंडळ सर्व सदस्य,सर्व बालाजी भक्त संस्थेचे अध्यक्ष विनोद म्याना, उपाध्यक्ष अशोक इप्पलपेल्ली आदी उपस्थित होते. सोमवारी, ४ ऑगस्टला सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा हा सामाजिक उपक्रम होणार आहे. श्रमिक बालाजी मंदिराच्या वार्षिक महोत्सवासाठी इतर जिल्ह्याबरोबर राज्याबाहेरुनही भाविक दाखल झाले आहेत. मिरवणुकी नंतर रात्री करण्यात आलेल्या फटाक्यांच्या अतिषबाजीने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रात्री आरती नंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली. पहाटे सुप्रभातम, रुद्राभिषेक सकाळी होमहवन दुपारी आरती व हळदी समारंभ संध्याकाळी हरीपाठ, रात्री कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम झाला. व्यंकटरमणा गोविदा…. गोविंदा जयघोषात सावेडीतील श्री श्रमिक बालाजी भगवंताचे ३२ वे वाषिक ब्रम्होत्सवात श्री व्यंकटेश वरला कल्याणम ( बालाजी लग्न ) निमित्त दुपारी बालाजी व पदमावती,लक्ष्मी यांना सामुदायिक हळदी लावण्याचा कार्यक्रम झाला यावेळी माजी महापौर सौ. सुरेखा कदम,माजी महापौर शीला शिंदे, जयश्री म्याना,श्रमिक बालाजी महिला मंडळ व बालाजी महिला भक्त आदी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

What's Your Reaction?






