'सत्यं शोधं सुंदरम्‌' एकांकिकेने 'पुरुषोत्तम करंडक'चा शुभारंभ:10 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान भरत नाट्य मंदिरात 51 संघांची स्पर्धा

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ रविवार, दिनांक 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या 'सत्यं शोधं सुंदरम्‌' या एकांकिकेने हीरक महोत्सवी वर्षातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धा दिनांक 10 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी 51 संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेचे लॉटस्‌ शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथे विद्यार्थी प्रतिनिधींच्या उपस्थितीत काढण्यात आले. स्पर्धेसंदर्भातील नियमावली स्पर्धक संघांना सुरुवातीस समजावून सांगण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी स्पर्धकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून लॉटस्‌ निश्चित करण्यात आले. स्पर्धा दिनांक 10, 17 आणि 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 अशा दोन सत्रात होणार आहे. दिनांक 11 ते 16 ऑगस्ट आणि दिनांक 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा सायंकाळी 5 ते 9 या वेळात आयोजित केली जाणार आहे. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दरम्यान, नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 34व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीयोगी मुंगी यांनी "नाट्यकलेद्वारे माणूस केवळ शिकत नाही तर चांगला, आदर्शवत माणूस म्हणूनही घडतो" असे मत व्यक्त केले. ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. त्यांनी स्पर्धकांना गोष्टीरुपी मार्गदर्शन करताना निसर्गातील पाने, फुले, वेली, फळे आणि बागा मानवी जीवन सुंदर करण्यासाठी कशा मदत करतात हे सांगितले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सांगितले की या स्पर्धेत सहाशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमात 'सुमन नाट्यछटा' आणि संध्या कुलकर्णी लिखित 'सप्तरंगी नाट्यछटा' या दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

Aug 5, 2025 - 16:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow