शरद पवारांसाठी 'रयत'च्या नियमांत खाडाखोड:लक्ष्मण हाके यांचा आरोप; रयत संस्थेला फक्त पवारांचेच लोक चालतात का? असा सवाल

रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम आहे. पण त्या नियमात खाडाखोड करत त्याच्या अध्यक्षपदावर शरद पवारांना कायम करण्यात आले, असा गंभीर आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी एकच खळबळ उडवून दिली आहे. लक्ष्मण हाके गत काही दिवसांपासून सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. त्यात आता रयत शिक्षण संस्थेमधील पदांवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हाके नांदेड येथे बोलताना म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांच्याच कुटुंबात सर्व पदे आहेत. त्यांना एवढे पद कशासाठी हवेत? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम आहे. असे असतानाही त्या नियमात खाडाखोड करून त्याच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना कायम करण्यात आले. या संस्थेवर पवार कुटुंबातील सदस्यच का लागतात? माझ्यासारखे बारामती ॲग्रो सारखे अकाउंट नाही कारखाने तुमचे, बँका तुमच्या, शिक्षण संस्थाही तुमच्याच. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरही पवारच आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालणाऱ्या अजित पवारांनाच सातत्याने अर्थमंत्रीपद का लागते? असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावरही निशाणा साधला. अमोल मिटकरी माझ्यावर माझ्या वाहन चालकाचा पगार थकवल्याचा आरोप करत आहेत. मी माझ्या चालकाचा पगार दिला आहे. माझ्याकडे बारामती ॲग्रो सारखे अकाउंट नाही, असे ते म्हणाले. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या चालकाला कधी पाच हजार, तर कधी 10-20 हजार रुपये दिले. आमची चूक एवढीच झाली की, आम्ही त्याची सही घेतली नाही. तो चालकही आमचाच कार्यकर्ता आहे. आम्ही त्याचे वेतन देऊ, पण हे अजित पवार आमच्या ओबीसींना आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देणार आहेत का? माझ्यावर वैयक्तिक हल्ले करून कुणालाही काही मिळणार नाही. हा लक्ष्मण हाके बोलायचे थांबणार नाही, असेही हाके यावेळी बोलताना म्हणाले. लक्ष्मण हाकेंना झाकणझुल्या पुरस्कार द्या -मिटकरी दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना झाकणझुल्या पुरस्कार देण्याची उपरोधिक मागणी केली आहे. लक्ष्मण हाके यांना YZ उपमा योग्यच होती. जो स्वजातीच्या OBC बांधवांवर अन्याय करून ड्रायव्हरकी चा पगार देऊ शकत नाही, तो फॉर्च्यूनर गाडी लोकांनी दिली ही कोणत्या तोंडाने म्हणू शकतो? असे फक्त झाकणझुल्याच करू शकतो. याला एखाद्या झाकणझुल्या पुरस्कार 2025 देण्याची शिफारस मी करत आहे, असे ते म्हणालेत. हे ही वाचा... सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी:संजय राऊत यांच्या फोननंतर धडक कारवाई; नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? - बडगुजर नाशिक - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

Jun 5, 2025 - 04:49
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow