प्रांजल खेवलकर यांचा जामिनाचा मार्ग मोकळा:पण जामिनासाठी अजून याचिकाच दाखल नाही; खडसे कुटुंबीयांचे राजकारण काय?

पुण्यातील एका कथित रेव्ह पार्टीसंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई तथा महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अर्थात यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण खेवलकर यांच्यातर्फे अजून कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली नाही. परिणामी, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर पुणे पोलिसांनी 2 आठवड्यांपूर्वी छापेमारी केली होती. त्यात प्रांजल खेवलकर व दोन महिलांसह 7 जणांना अटक करण्यात आली होती. ही पार्टी रेव्ह पार्टी असल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. तसेच खेवलकर यांच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो आढळल्याचाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे व एकनाथ खडसे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. कोर्टाने प्रारंभी खेवलकर व इतर आरोपींना पोलिस कोठडीत पाठवले. पण त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडीमुळे जामिनाचा मार्ग मोकळा न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे खेवलकर यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण अजूनही त्यांच्या वकिलाने कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली नाही. त्यामुळे खेवलकर सध्या येरवडा तुरुंगातच बंदिस्त आहेत. जावई तुरुंगात असतानाही खडसे कुटुंबीयांनी अजून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू न केल्यामुळे याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण आता खडसे कुटुंबीयांनी आतापर्यंत जामीन याचिका दाखल केली नाही? याचे खरे कारण समोर आले आहे. जामिनासाठी नव्हे एफआयआर रद्द करण्याचे प्रयत्न सूत्रांच्या माहितीनुसार, खडसे कुटुंबीयांसाठी प्रांजल खेवलकर यांचा जामीन महत्त्वाचा नाही, तर त्यांच्यावरील रेव्ह पार्टीचा डाग मिटवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी अजून जामिनासाठी याचिका दाखल केली नाही. त्यांचे वकील लवकरच खेवलकर यांच्यावरील एफआयआर रद्दबातल करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणार आहेत. यामुळेच त्यांनी अजून जामीन याचिका दाखल केली नाही. एकनाथ खडसे यांनीही याविषयी बोलताना हा सर्व ट्रॅप असल्याचा दावा केला आहे. आम्ही जामिनासाठी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे जावयाला अजून जामीन मिळाला नाही हा प्रश्नच येत नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर अधिक बोलणे बरे नाही. पण हा सर्व प्रकार ट्रॅपचा आहे. हे एक षडयंत्र आहे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे रोहिणी खडसे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची विस्तृत माहिती दिली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी एका पोस्टद्वारे आपण भक्कमपणे रोहिणी खडसे यांच्या पाठिशी उभे असल्याचे स्पष्ट केले होते. हे ही वाचा... संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान:म्हणाले - सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरूष; लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा संकल्प नाशिक - शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्म समभावाच्या मुद्यावर आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष. हा निव्वळ नपुंसकपणा आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला. वाचा सविस्तर

Aug 5, 2025 - 16:50
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow