कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही:पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे CM चे निर्देश
दादरमधील कबुतर खाना अचानक बंद करणे योग्य नाही. या संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कबुतर खाना अचानक बंद करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या संदर्भात पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत. समाजातील लोकांची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय समतोल निर्णय घेतला आहे. कबुतरांना अन्न टाकल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत असेल तर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून फीडिंग आणि साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एकाही कबुतराचा मृत्यू व्हायला नको, असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने कबुतरांचे फीडिंग आणि मशीनद्वारे स्वच्छता, साफसफाई करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे बैठकीनंतर मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे. नागरिकांचे जीवन देखील सर्वात महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात जास्त आहे. मात्र, त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको. त्या संदर्भातले स्पष्ट निर्देश फडणवीसांनी दिले. लोकांच्या जीवनाचे महत्त्व सर्वात जास्त आहे. मात्र त्याबरोबर कबुतराचा मृत्यू देखील व्हायला नको, यासाठी काही शास्त्रोक्त पद्धती असते. त्याचा अवलंब करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करण्यात यावी. शहरात विविध ठिकाणी कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे श्वसनविषयक त्रास, विष्ठेमुळे होणारे प्रदूषण आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या निर्माण होतात. परंतू याबाबत कबुतरखान्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असून, त्यासाठी संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा. कबुतरांच्या विष्ठेचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात विष्ठा साफ करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तांत्रिक उपायांचा विचार करावा. या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हायकोर्टात राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी कबुतरखान्याशी संबंधित मुद्यावर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर हायकोर्टात राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, आवश्यकतेनुसार राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल. मुंबई महापालिकेला पक्षी गृह उभारण्याची व त्याची देखभाल करण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवला लोकांची भावना आणि शंभर वर्ष जुनी परंपरा लक्षात घेऊन या संदर्भातले महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे या संबंधी आवाज उठवणारे गिरिश महाजन यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा मान ठेवून एकही कबुतर मृत होऊ नये, यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचा आम्हाला आनंद झाला असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

What's Your Reaction?






