निर्णय:‘अतिक्रमण हटाव’ला विरोध; हॉकर्स आजपासून देणार नाहीत दैनंदिन कर, हातात खेळण्यातील बंदुका घेऊन धडकले जिल्हा कचेरीवर‎

मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्सने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील कोणत्याही हॉकर्सने मनपाचा दैनंदिन १० रुपयांचा कर द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या मुद्द्याची सोडवणूक करण्यासाठी हॉकर्स युनियनने सोमवारी दुपारी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. मनपा प्रशासनाने आमचा रोजगार बंद पाडून आम्हाला दहशतवाद्यांसारख्या हातात बंदुका घ्यायला बाध्य केले आहे. त्यामुळे खेळण्यातील बंदुका घेऊन पुरुष, महिला, तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘आपका हॉकर्स सेवक’ असे नवे नाव मिळालेले गाडगे नगरातील हॉकर्स गणेश मारोडकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मारोडकर हे राष्ट्रीय हॉकर्स धोरण राबवण्यासाठी मनपाने गठित केलेल्या टाऊन व्हेंडिंग कमिटीचे (टीव्हीसी) सदस्यही आहेत. त्यांच्या मते, अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यापूर्वी मनपाने शहरातील सर्व हॉकर्सला पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी हॉकर्स झोन निश्चित करून त्याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणेही गरजेचे आहे. हे सर्व करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रथमत: टीव्हीसीची बैठक घ्यायला हवी होती. बैठकीत सर्वानुमते चर्चा करून काहीतरी योग्य तोडगा निघाला असता. परंतु तसे न करता प्रशासनाने एकतर्फी कारवाई सुरू केली. त्यामुळेच शहरातील सर्व हॉकर्स या मोहिमेच्या विरोधात उभे ठाकले असून ही मोहीम त्वरित थांबवावी, अशी हॉकर्स युनियनची मागणी आहे. या मागणीसाठी शहरातील बहुतेक हॉकर्स सोमवारी दुपारी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गोळा झाले. आंदोलनाचा उद्देश कथन झाल्यानंतर मारोडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहोचला. याठिकाणी पुन्हा छोटेखानी सभा झाली. हॉकर्सचा लढा हे दीर्घकाळ चालणारे आंदोलन आहे. त्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या सभा, बैठका, मोर्चा आदींसाठी आपापले व्यवसाय बंद ठेवून सहभागी होण्याचे अभिवचन यावेळी घेण्यात आले. आंदोलनाच्या {उर्वरित. पान ४ स्वत:चे अतिक्रमण हटवा हॉकर्सवर कारवाई करण्यापूर्वी मनपाने आपले स्वत:चे अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मनपाने राजकमल चौकातील मुख्य इमारतीसमोर व्यापारी संकुल उभे केले आहे. परंतु या संकुलाचे बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा सोडली नाही. पार्कींगसाठीच्या जागेवरही व्यापारी गाळे बांधण्यात आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने आधी ते अतिक्रमण हटवावे. शिवाय शहरातील बड्या नागरिकांनी केलेले अतिक्रमण का काढू नये, आदी प्रश्नही उपस्थित केले. नियमबाह्य काही होणार नाही, याकडे माझे लक्ष ^शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही योग्यरितीने पुढे जात आहे की नाही, एवढेच मला बघायचे आहे. हॉकर्सने मोर्चादरम्यान दिलेले निवेदन मी स्वीकारले आहे. परंतु त्यात हस्तक्षेप तेव्हाच करता येईल, जेव्हा नियमबाह्य काही झाले असेल. त्यादृष्टीने मी बघतो आहे. दरम्यान हॉकर्सने व्यक्त केलेल्या मुद्द्यांबाबत मनपा प्रशासनाशी ही बोलेन. -आशिष येरेकर, जिल्हाधिकारी, अमरावती.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow