महिला पोलिसाचा गळा दाबणारे दोघे, पतीची प्रेयसी अटकेत:65 दिवसांपासून पतीने रचला खुनाचा कट; मारेकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने 36 हजार ‘ॲडव्हॉन्स’, प्रत्येकी 5 लाखांचे आमिष
फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस अंमलदार आशा धुळे (तायडे) यांचा १ ऑगस्टला गुरुकृपा कॉलनीतील राहत्या घरात जाऊन दोघांनी गळा दाबून खून केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला सोमवारी (दि. ४) यश आले. तसेच सोमवारी सायंकाळी पोलिसांनी मृत पोलिस अंमलदाराच्या पतीच्या २९ वर्षीय प्रेयसीलाही अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. श्रेयस संजय महल्ले (२५, रा. महारुद्र कॉलनी, अर्जुननगर) आणि ओम मोरेश्वर शेकार (१८, रा. रामनगर गल्ली क्र. १, देशमुख लॉन परिसर, अमरावती) यांना सोमवारी गुन्हे शाखा युनिट दोनचे पीआय संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने माहुली जहागिर येथून अटक केली. तसेच निखिल टिकले यालाही सायंकाळी ताब्यात घेतले. श्रेयस, ओम व निखिल हे नेहमीच गुरुकृपा कॉलनीतील राहुल तायडेच्या घरामागच्या मैदानावर जात होते. त्याच ठिकाणी राहुल तायडे आणि श्रेयसची भेट १५ ते २० मे दरम्यान झाली होती. त्यानंतर राहुलने माझ्या पत्नीचा मला काटा काढायचा आहे, असे श्रेयसला सांगितले. यासाठीच राहुलने मे महिन्यापासून १ ऑगस्टपर्यंत श्रेयसला ३६ हजार रुपये दिले. तसेच खून केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी ४ ते ५ लाख रुपये देईल, असे आश्वासनही ओम, श्रेयस व निखिलला दिले होते. १ ऑगस्टला राहुलला श्रेयस, ओम व निखिल भेटले. त्यानंतर ओम व श्रेयसने ७०० रुपयांचे दोन शर्ट विकत घेतले. इतक्यातच राहुलने त्यांना सव्वापाच वाजता मी बाहेर जात आहे, घरात आशा झोपली आहे असे सांगितले. अर्धा तास तुमच्याकडे आहे, या दरम्यान तुम्ही चोरीचा बनाव करून खून करा, असे सांगितले. नंतर श्रेयस व ओम हे दोघे साडेपाच वाजताच्या सुमारास तायडेच्या घरात गेले. त्यावेळी तोंडाला बांधलेला दुपट्टा सोडून श्रेयस व ओमने आशा यांचा गळा आवळला मात्र आशा यांनी या दोघांचाही प्रतिकार केला. यादरम्यान आशा कॉटवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला, त्यानंतर पुन्हा दोघांनीही आशा यांचा काही मिनिटे {उर्वरित. पान ४ १ ऑगस्टला खून केल्यानंतर मध्यरात्री २ वाजता तिघेही शेगावात पोहोचले. एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. २ ऑगस्टला सकाळी हॉटेलमधून ते दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन पुन्हा अमरावतीला परतले. आरोपींनी खून केल्यानंतर संतनगरीत देवदर्शन श्रेयसवर अगोदरच दोन गुन्हे आहेत दाखल ^श्रेयस महल्लेविरुद्ध चोरी व चोरीचा प्रयत्न असे दोन गुन्हे अगोदरच दाखल आहेत. सुमारे ६० ते ६५ दिवसांपासून हा कट रचला जात होता. या प्रकरणात मृत महिलेच्या पतीच्या प्रेयसीला सुद्धा अटक केली आहे. -गणेश शिंदे, डीसीपी.

What's Your Reaction?






