गोदाकाठची हेमांडपंथी शिवालये शिवभक्तांच्या गर्दीने फुलली

कुकाणे दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त गोदावरी -प्रवरासंगम काठावरील सिद्धेश्वर मंदिरात तसेंच गोदेच्या पैलकाठावरच्या रामेश्वर मंदिरासह घटेश्वर अशा गोदाकाठच्या शिवालयात सोमवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बम बम भोले घोषात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. टोका ता. नेवासे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसर पहाटे पासूनच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. टोका येथील शिवालया जवळ विष्णू, महादेव व गजरादेवी अशी तीन मंदिरे त्यात एकाच दगडात असलेला भला मोठा नंदी, गरुडमूर्ती व साखळीने बांधलेली पितळी घंटा आहे. पुरातत्त्व विभागाच्या अख्यारीत हे मंदिर आहे. या ठिकाणचा गोदावरी व प्रवरानदी संगम बघण्यासारखा आहे. जम्मू काश्मीरच्या जम्मू जिल्हा भाजप अध्यक्ष नंदकिशोर शर्मा व अंकुश शर्मा यांचे मंदिरात पूजा, महाआरती करण्यात आली. किरण देवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रसंगी पौराहित्य केले. तर गोदाकाठच्या पैलतीरावर असलेल्या कायगाव. ता गंगापूर येथील रामेश्वर मंदिरातही दिवसभर भाविकांची गर्दी होती. सिद्धेश्वर व रामेश्वर या शिवालयात गोदावरीचे पात्र आहे. भाविक सिद्धेश्वराचे दर्शन घेतले की पुलावरून अर्धा किमी असलेल्या रामेश्वर मंदिरात जात असतात. वैजापूर, गंगापूर, कन्नड, नेवासे, नगर, शेवगाव, श्रीरामपूर परिसरातील भाविकांची अधिक गर्दी या शिवालयात असते. सिद्धेश्वर व रामेश्वर मंदिराच्या मध्यभागी गोदावरी पात्रात मुक्तेश्वर मंदिर आहे. हे शिवालय गाभाऱ्यासह पाण्यात गेलेले आहे. अर्धे मंदिर जलमय झालेले आहे. टोका येथील सिद्धेवर मंदिर काठी गोदावरी तिरावर घडीव दगडी काठ असल्यामुळे काठाची माती निखळू नये म्हणून दगडी भक्कम बुरुज आहे. श्रावणात पहाटे पासून भाविक गंगेच्या स्नानास इथे येत असतात. मंदिर परिसरात शिवभक्त प्रसादरुपी फळांचे वाटप करत होते. सिद्धेवर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी आहे. येथे मात्र स्वछतागृहांचा अभाव आहे. त्यामुळे महिला भक्तांची कुचंबणा होते. पुरातत्व विभागाने भाविकांच्या सुविधाचा विचार करावा अशी शिवभक्तांची मागणी आहे. बालब्राह्मचारी महाराज यांचे समाधीस्थळही या परिसरात असून तेथेही भक्त दर्शनाला जात असतात.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow