आंदोलन:जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारामध्येच अंगणवाडी ताईंचे ठिय्या आंदोलन, एफआरसीमुळे टीएचआर वाटपात गोंधळाकडे वेधले लक्ष‎

पोषण ट्रेकर ॲपद्वारे टीएचआर वाटप करताना फेस रेकग्नायझेशन सिस्टिममुळे (एफआरसी) उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार, वेतनश्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढीच्या प्रश्‍नासंदर्भात जिल्हा अंगणवाडी सेविका मदनीसांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून धरणे आंदोलन केले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषदेत दाखल झाल्या होत्या. सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला. आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉ. मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरडे, मायाताई जाधव, सविता दरंदले, मन्नाबी शेख, निर्मला चांदेकर, भगीरथी पवार, शोभा पवार, रतनताई गोरे, अलका दरंदले, शोभा विसपुते, सुनिता बोर्डे‌, शशिकला औटी आदी उपस्थित होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे सहा महिने ते तीन वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना टीएचआर वाटप केला जातो. या अगोदर पालकांचे रजिस्टर सह्या घेऊन टीएचआर वाटप केला जात होता, परंतु आता दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पोषण ट्रॅक्टरमध्ये फेस रिकगनायझेशन देणे आवश्यक आहे. पोषण ट्रॅकर ॲप मध्ये फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळेद्वारे टीएचआर वाटप करण्यात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण आदिवासी भागात नेटवर्क नाही, त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही. देशभरातील अंगणवाडी सेविकांना फेस रिकगनायझेशन सिस्टिममध्ये काम करण्याची वेळ एकच असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत त्यामध्ये फोटो अपलोड होत नाही. आधारशी अनेक पालकांनी मोबाइल नंबर संलग्न केले नाही व काही पालक उपस्थित नसल्याने ओटीपी मिळू शकत नाही. सर्व्हर डाऊन आदी अडचणींचा पाढा सेविकांनी वाचला. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) महादेव जायभाय यांना देण्यात आले. ठिय्या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करताना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका. निकृष्ट आहाराला नकार अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना देण्यात येत असलेला आहार निकृष्ट दर्जाचा असून, पालकांच्या तक्रारी येत आहेत. पालक टीएचआर स्वीकारण्यास नकार देत असल्याने कर्मचारी व लाभार्थी पालक यांच्यात वाद होतात, या मुद्द्याकडेही सेविकांनी शासनाचे लक्ष वेधले. उन्हाळ्यात कोरडा शिधा द्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अति उष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात. त्यामुळे या कालावधीत कोरडा शिधा वाटप करावा व त्यासाठी पोषण ट्रॅकरमध्ये फोटो घेण्याची अट लावू नये, अशीही मागणी सेविकांनी केली.

Aug 5, 2025 - 16:53
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow