परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर करा:केंद्रशासनाच्या धर्तीवर परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची विद्यार्थी समन्वय समितीची मागणी

शासन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्यासारखं त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. वारंवार परीक्षा वेळापत्रक बिघडणे, परीक्षा पुढे ढकलणे, पेपर फुटी प्रकार होणे प्रकार घडत आहे. त्यामुळे केंद्रशासन किंवा केरळ, तामिळनाडू राज्यामध्ये जो पॅटर्न आहे, त्याप्रमाणे प्रत्येकच परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर करावे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीचे विठ्ठल बडे यांनी पत्रकार परिषदेत केली. बडे म्हणाले, एमपीएससी मधून होणाऱ्या निवडक पदांच्या परीक्षा वगळता इतर कोणत्याही परीक्षांचे वेळापत्रकच नाही. त्या पदांची संख्या जास्त आहे, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. प्रचंड अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांना नियोजन करणे कठीण जात आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासासोबतच पुढील शिक्षण घेत आहेत, नोकरी करून घर सांभाळून अभ्यास करत आहेत. अनेक परीक्षा 5-5 वर्षे होत सुद्धा नाहीत. ज्या होतात, त्या नियमित होत नाहीत. 25 लाख स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी शासनावर प्रचंड नाराज आहेत. या सर्वांचा फटका शासनाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचा इशारा ही बडे यांनी यावेळी दिला. ज्याप्रमाणे केंद्रशासन किंवा केरळ, तामिळनाडू राज्यामध्ये जो पॅटर्न आहे, त्याप्रमाणे प्रत्येकच परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर असावे. ज्यामध्ये जाहिरात, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, निकाल कधी लागेल? याबद्दल शासनाने विद्यार्थ्यांना कमीत कमी 4-5 महिने तरी कळवावे आणि त्या कॅलेंडरनुसारच परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी ही बडे यांनी यावेळी केली.

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow