पंतप्रधान मोदींनी भारताला निराश केले:मोदींमुळेच अमेरिकेने भारतावर आपली इच्छा थोपली -आंबेडकर; हाउडी मोदी, नमस्ते ट्रम्पचा दाखला

अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी भारताला निराश केले. त्यांच्यामुळेच अमेरिकेने भारतावर आपली इच्छा थोपली, असे ते म्हणालेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्याच्या घोषणा केली आहे. एवढेच नाही तर इतरही अनेक अतिरिक्त दंड लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भारतीय उद्योग जगतात एकच खळबळ माजली आहे. विरोधकांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठली असताना प्रकाश आंबेडकर यांनी उपरोक्त टीका केली आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला निराश केले आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला. हा कर इतर सर्वच देशांच्या तुलनेत आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. भारत कधीही अशा आर्थिक दबावापुढे झुकला नाही. कधी झुकणारही नाही. उलट तो नेहमीच आपल्या राष्ट्रीय हितासाठी ठामपणे उभा राहिला असून, यापुढेही राहील. भारताने विसरू नये की, मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनांशी संबंधित एचएसएस व अमेरिकेतील इतर हिंदुत्ववादी संघटनांनी 2016, 2020 व 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांना डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे आता अमेरिका भारतावर जी आपली इच्छा थोपण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सर्वस्वी पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. 'हाउडी मोदी, नमस्ते ट्रम्प'चा वाद उल्लेखनीय बाब म्हणजे मोदी सरकारने 22 सप्टेंबर 2019 रोजी अमेरिकेच्या ह्यूस्टन येथे हाउडी मोदी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक करताना 'अबकी बार, ट्रम्प सरकार' असा नारा दिला होता. मोदींनी या नाऱ्याद्वारे 2020 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचे समर्थन केल्याचा आरोप केला जातो. या कार्यक्रमानंतर मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2020 रोजी अहमदाबाद येथे 'नमस्ते ट्रम्प' नामक एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातही मोदी व ट्रम्प यांनी एकमेकांचे कौतुक केले होते. हा कार्यक्रम ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराशी थेट संबंधित नव्हता. पण विश्लेषकांनी हा कार्यक्रम अमेरिकेतील भारतीय समुदायावर प्रभाव पाडण्यासाठी महत्त्वाचा ठरल्याचा दावा केला होता. हे ही वाचा... रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना ट्रकने चिरडले:4 जणांचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ; गडचिरोली - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भयंकर घटना गडचिरोली - रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या 6 तरुणांना ट्रकने चिरडल्याची भयंकर घटना गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथे घडली आहे. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे अत्यवस्थ आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वाचा सविस्तर

Aug 8, 2025 - 07:09
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow