तरुणाच्या चेहऱ्यावर ब्लेडने हल्ला:भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्याला पळणाऱ्या व्यक्तीने केला जखमी
पळून जाणार्या एकाला पकडत असताना त्याने ब्लेडने भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याचा चेहर्यावर वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी हल्ल्यात तरूणाच्या चेहर्यावर अकरा टाके पडले आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. हा प्रकार बुधवार पेठेतील आझाद मित्रमंडळ चौक येथे ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत रोहित कृष्णा चव्हाण (२५, रा. ओम शंकर अपार्टमेंट, देवाजी बाबा मंदिरासमोर, रविवार पेठ) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार यांचा इलेक्ट्रीक सर्व्हिसेसचा व्यावसाय आहे. तसेच ते भाऊसाहेब रंगारी मंडळाचे कार्यकर्ता म्हणून देखील काम करतात. दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाही सहा वाजण्याच्या सुमारस ते भाऊसाहेब रंगारी मंडळ येथे आरतीसाठी आले होते. आरती संपल्यानंतर आठ ते नऊ जण मिळुन सुप्रीम सँडवीच येथे नाष्टा करण्यासाठी गेले होते. तेथून पुन्हा भाऊसाहेब रंगारी मंडळाकडे येत असताना सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एक माणुस व त्यांच्यामागे तक्रारदारांच्या मंडळाचे कार्यकर्ते पळत येत असताना दिसले. त्यावेळी तक्रारदाराने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्या हातातील ब्लेडने रोहीतच्या यांच्या चेहर्यावर वार केले. आरोपीने डाव्या डोळ्यापासून ओठापर्यंत ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहीत यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तरूणाने पाठलाग केल्याने अल्पवयीन मुलीने खाल्ल्या बारा गोळ्या छेड काढण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याने घाबरलेल्या मुलीने घरातील जुन्या औषधातील १२ गोळ्या खाल्ल्या. यानंतर मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दि. ५ऑगस्ट रोजी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत एका १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून फरसखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?






