संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान:म्हणाले - सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरूष; लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा संकल्प

शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्म समभावाच्या मुद्यावर आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष. हा निव्वळ नपुंसकपणा आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला. संभाजी भिडे यांचा नाशिकमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यात बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. सर्वधर्म समभाव हा ना धड स्त्री ना धड पुरुष असा प्रकार आहे. म्हणजे निव्वळ नपुंसकपणा. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे, पण ते शक्य आहे का? तर नाही. म्हणून सर्वधर्म समभाव हा निचपणा आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आंबा खाल्ल्यानंतर मूल जन्माला येते या आपल्या विधानाचाही पुनरुच्चार केला. तसेच आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. आबे खाऊन मूल होतात असे मी एकदा म्हणालो होतो. आजही मी एक आंब्याचे झाड लावले आहे. तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. याविषयी माझा एक कोर्टात खटला सुरू आहे, असे ते म्हणाले. खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्रजाप केल्याने शक्ती मिळते संभाजी भिडे पुढे म्हणाले, खग्रास ग्रहणाच्या काळात मनुष्याने एखाद्या मंत्राचा जप केला तर त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गायत्री मंत्राचा जप केला होता. ते काही तास मानेपर्यंत थमंड पाण्यात बसून होते. 3 एप्रिल रोजी त्यांना ताप असह्य झाला. त्यांना तोंडावाटे पाणी दिलेले पाणी शरीराबाहेर पडत होते. शरीर पूर्णपणे खचले होते. तेव्हा ते आपल्या जवळ असणाऱ्यांना म्हणाले होते, आम्ही जातो, आमचा काळ झाला. सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा. हे त्यांचे अखेरचे शब्द होते. सोयराबाई यांना जे हवे होते ते शक्य नव्हते. छत्रपती संभाजी महाराज राजे व्हावेत असे त्यांना वाटत नव्हते. राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्यानंतर राजे झालेच. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यात साम्य काय, तर संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तीमत्व होते. पण संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस निघाला. त्याने वतनासाठी शेण खाल्ले. लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार संभाजी भिडे यांनी यांनी यावेळी लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचाही संकल्प व्यक्त केला. आपण स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेडा स्वीकारला. तिरंगा व संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. त्यामुळे देव, देश व धर्मासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्यावर भगवा फडकवण्यासाठीही काम करत राहू, असे ते म्हणाले. हे ही वाचा... संजय राऊत यांचा NDAच्या बैठकीवरुन भाजपसह मोदींवर निशाणा:हत्तीसाठी आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांनाही टोला- शेतकरी आत्महत्या दिसत नाही का? मुंबई - इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीची धास्ती घेतल्या मुळेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए मधील घटक पक्षांची बैठक आयोजित केली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी पीओके परत घेतला असता, तर इंडिया आघाडीने देखील त्यांचा सत्कार केला असता. मात्र, आता एनडीए त्यांचा सत्कार का करत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर

Aug 5, 2025 - 16:50
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow