मराठा ओबीसी वाद लावण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव:आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार- मनोज जरांगे पाटील

मराठा व ओबीसी वाद लावण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखला असून त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत‌. मराठा - ओबीसी दोघेही बांधावर राहतो त्यामुळे कधीही आपण वाद घालणार नाही असे मत मनोज दादा जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. येत्या दि.29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील फलटण येथील सजाई गार्डन या ठिकाणी अखंड मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने आयोजित केली होती‌ यावेळी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सांगितले की त्यांचा मराठा ओबीसी मधील वाद वाढवण्याचा हेतू असून त्यांचा हेतू कधीही सफल होणार नाही. उलट मराठा ओबीसी वाद लावणाऱ्या फडणवीस यांनी ओबीसीसाठी तरी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा अडचणीत येणार आहेत, आमचा डीएनए ओबीसींचा असल्याचे ठासून सांगणाऱ्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. तुमची मुलेबाळे मोठी होऊ नयेत. त्यांना नोकऱ्या मिळू नयेत. तसेच तुमचा फक्त राजकारणासाठी वापर सुरू केला असून आता त्यांनी ओबीसींना घेऊन गोव्याला अधिवेशन घेतले अन् तुमच्या महाराष्ट्राचा खर्च केला असून आता त्याची सगळेच कामे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सुरू आहेत असे जरांगे पाटील यांनी सांगितले. फडणवीस यांनी कधी दलीत मुस्लिम वाद लावला तर कधी धनगर समाजाचा वाद निर्माण केला. परंतु आता त्यांचा डाव मराठ्यांनी ओळखला असून पश्चिम महाराष्ट्रातील एकही मराठा आता घरी बसणार नाही. उलट आता नुकतेच ओबीसींचे अधिवेशन घेऊन मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याने भाजपासह सर्वच पक्षातील मराठा नेत्यांनी चलो मुंबईचा नारा दिला असून प्रत्येकाने मोटारसायकल असो की चार चाकी असो. कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईला येण्यासाठी उत्सुक झाले असून आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस हे घाण विचारांचे असून त्यांनी मराठा समाजाला संपविण्याचा घाट घातला आहे. परंतु आता संपुर्ण महाराष्ट्रातील मराठे एकवटले आहेत, व येणाऱ्या 29 ऑगस्टला कोट्यवधी मराठे मुंबईत धडक देणार आहेत व आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. दरम्यान फलटण येथे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला संपविण्याचा घाट घालीत आहेत मात्र आता त्याची कूटनीती सर्वच पक्षातील मराठा नेत्यांना लक्षात आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते गावागावात, शहराशहरात तसेच तालुक्यातील जनता आता मुंबईच्या लढ्यासाठी कोटींच्या संख्येने दाखल होणार आहे. पत्रकारांनी विचारले की धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे पाटील यांनी सांगितले की अजितदादा पवार काय पण फडणवीस सुद्धा त्यांना मंत्रिपद देऊ शकणार नाहीत अन् दिले तर मग त्यांना नक्कीच पाश्चाताप होईल असे सांगत संतोष देशमुख खुनात सुद्धा त्यांनी अनेक कॉल केले असल्याचे संतोष देशमुख यांच्या भावाने सांगितले आहे असेही सांगितले.

Aug 9, 2025 - 07:38
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow