पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबचा शुभारंभ:नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची पुण्याची क्षमता - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब'चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुणे शहर प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र आहे. नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. हा ग्रोथ हब नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब'ला गती देण्याचे काम नीती आयोग करणार आहे. याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन पीएमआरडीए तयार करणार आहे. त्याला पुणे इंटरनॅशनल सेंटर मदत करणार आहे. फडणवीस म्हणाले की नियोजित पद्धतीने विकास केल्यास जीवनशैलीतील सुलभताही साध्य करता येऊ शकते. आज ६५ टक्के जीडीपी शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. योग्य नियोजनातून ही वाढ गतिमान करता येऊ शकते. त्यांनी पुढे सांगितले की केंद्र शासनाने विदेशातील विद्यापीठांना भारतात कॅम्पस उभे करण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्याचा लाभ घेत राज्य शासनाने नवी मुंबईत 'एड्युसिटी' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी जगातील 5 नामांकित विद्यापीठांनी सामंजस्य करार केला असून १० विद्यापीठे येथे येतील. पुढील 4-5 वर्षात किमान ५० हजार विद्यार्थी येथे शिकतील. त्यातून केवळ जीएसटीचे 2 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगांसाठीचे मनुष्यबळ निर्माण होईल. या विद्यापीठांमुळे एआयवर आधारित नवी क्रांती येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी जागतिक उद्योग या ठिकाणी येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Aug 2, 2025 - 06:19
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow