पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात शक्य:केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांची घोषणा; लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

काही पुरस्कार व्यक्तीची प्रतिष्ठा वाढतात, तशीच माझी प्रतिष्ठा वाढवणारा पुरस्कार मला मिळाला असल्याबद्दल अतिशय आनंद झाला असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्रनिर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला गेला आहे. टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक उपस्थित होते. पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात देशात पैशाची किंवा टेक्नॉलॉजीची कमतरता नाही. मात्र, देशासाठी काम करणाऱ्यांची कमतरता असल्याची खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. मुंबईपासून बंगलोर पर्यंत आपण नवा महामार्ग तयार करत असून या महामार्गामुळे पुणे ते मुंबई अंतर केवळ दीड तासात पोहोचणे शक्य होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. माझ्या विभागाकडे भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा पडलेला आहे. मात्र तो खर्च करणारेच नसल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. राजकारणाला न पटणारे सत्य नितीन गडकरी बोलतात - देवेंद्र फडणवीस राजकारणात सत्य माहिती असून देखील ते बोलू नये, असे मानले जाते. कारण अनेक वेळा त्या सत्य बोलल्याने आपलेच नुकसान होत असते. मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की, नितिन जी हमखास सत्यच बोलतात. कितीही नुकसान झाले तरी नितीनजी तेच बोलतात, जे त्यांच्या मनात आहेत. ते कधीच सोयीचे किंवा राजकारणाला जे पटेल ते बोलणार नाहीत. त्यांच्या मनात जे आहे, ते तेच बोलतील. त्यांचा हाच स्पष्टवक्तेपणा लोकांना जास्त मनापासून आवडतो, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अजित पवार आणि नितीन गडकरी यांच्यात एक साम्य - देवेंद्र फडणवीस कुठेही नवीन कन्स्ट्रक्शन झाले की, गडकरी आणि अजित पवार हे पाहणी करण्यासाठी जातात. मात्र, त्या ठिकाणी या कामात काय चुकले? ते हे दोघेही शोधून काढतात. अशा शब्दात फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि अजित पवार यांच्यात हे सामन्य असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर संबंधित अधिकाऱ्यांची सर्वासमक्ष खरडपट्टी काढतात. कोणतेही काम गुणवत्ता पूर्णच असायला हवी, असा त्यांचा मानक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Aug 2, 2025 - 06:20
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow