भानखेडा शिवारात महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला:ग्राम महसूल अधिकारी जखमी, सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने टिप्पर पकडल्यानंतर वाळू माफियांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण करून टिप्पर पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांवर शुक्रवारी ता. 1 पहाटे सेनगाव पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्पर मधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांना मिळाली होती. त्यावरून घुटुकडे यांनी तीन ग्राम महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन गुरुवारी ता. 31 मध्यरात्री भानखेडा शिवार गाठले. या ठिकाणी पथकाने भानखेडा शिवाराजवळच वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले. त्यानंतर पथकाने चालकास टिप्पर पोलिस ठाण्यात घेऊन चला अशा सूचना दिल्या. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे यांना टिप्पर मध्ये बसविले. दरम्यान, उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांचे वाहन पुढे अन टिप्पर मागे धावत होते. यावेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र.एमएच-26बीसी 9566) दोन इसम व काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून (एमएच-38-एडी8059) नवनाथ राठोड व इतर खाली उतरले. त्यांनी टिप्पर थांबवून त्यात बसलेले ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांना खाली खेचून दगडाने मारहाण केली या शिवाय अश्‍लिल शिवीगाळ केली. दरम्यान, अचानक झालेल्या या प्रकारामुळे महसूलचे पथक प्रतिकार करू शकले नाही. त्यानंतर सहा जणांनी वाळूने भरलेले टिप्पर घेऊन पळ काढला. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शुभम खिल्लारे (रा. ब्रम्हवाडी), नवनाथ राठोड (रा. बोडखा) व इतर चौघांवर शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार पवन चाटसे, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

Aug 2, 2025 - 06:22
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow