दिलासा:तब्बल 25 गावांना पाणी पुरवणारा मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला, मुळा धरणाच्या कालव्यातून आवर्तन सुरु, शेतकऱ्यांमध्ये समाधान

तालुक्यातील पूर्व भागातील २५ गावांना पाण्याचा पुरवठा करणारा तसेच दोन हजार एकर शेतीसिंचन क्षेत्र अवलंबून असलेला मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच मुळा धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरु असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्या बरोबर वर्षभरातील रब्बी हंगामातील पिकाचे पाणी नियोजन शेतकऱ्यांना करता येणार आहे. यंदा अपवादात्मक पावसाचे दिवस वगळता जूून व जुलै महिना कोरडा गेल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र घाटमाथ्यावर तसेच मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण तांत्रिक दृष्ट्या भरत आल्याने मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशावरून पाटबंधारे विभागाकडून मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडून मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात आला. मुुसळवाडी जलाशयाची जल साठवण क्षमता १८९ दशलक्ष घनफूट आहे. जलाशयावर २५ गावांतील पिण्याचे पाणी योजना व दोन हजार एकर शेतीसिंचन क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुसळवाडी तलाव मुळा धरणातील डाव्या कालव्याद्वारे व भंडारदरा धरणातील उजव्या कालव्याद्वारे दरवर्षी भरला जातो. पूर्वीच्या काळी मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तत्कालीन शासनाने भंडारदरा धरणातील १५ टक्के पाणी राखीव ठेवून दरवर्षी तलाव १८९ दशलक्ष घनफूट क्षमतेने पाटबंधारे विभागामार्फत भरला जात होता. मात्र मतदार संघाच्या पुर्नरचनेत राहुरीची ३२ गावे श्रीरामपूर मतदार संघाला जोडल्यामुळे अलीकडच्या काळात निळवंडे धरणातून पाणी येणे बंद झाले. श्री.म्हसोबा महाराज पाणीवापर संस्थेमार्फत शेती सिंचनासाठी पाणी दिले जाते. मुसळवाडी तलाव भरण्या बरोबर मुळा धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे. १२ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात १ हजार ७७६ दशलक्ष घनफूट तर मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात २७६ दशलक्ष घनफूट,२७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत वांबोरी चारीतून ४८ दशलक्ष घनफूट पाणी लाभक्षेत्रात सोडण्यात आले आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा ५ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा पाणीसाठा २३ हजार ३९८ दशलक्ष घनफूट तर पाणी पातळी १७८७.४० फूट झाल्याने धरण ९० टक्के भरले आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची २० हजार ३०२ ( ७८ टक्के ) तर पाण्याची पातळीची १८०१.४० फूट ही नोंद झाली होती. या गावांना होतो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुसळवाडी तलाव मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शंभर टक्के भरून घेण्यात आला आहे. या जलाशयातून मुसळवाडी सह टाकळीमिया, मोरेवाडी, वाघाचा आखाडा, लाख ,जातप, दरडगाव, त्रिंबकपूर, मालुन्जा खुर्द ,महालगाव ,खुडसरगाव, माहेगाव ,पाथरे खुर्द, शेणवडगाव, कोपरे, तिळापूर, बोरीफाटा, वांजुळपोई गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow