अजित पवारांनी मला कृषी खाते देऊ केले होते:छगन भुजबळ यांचा दावा, म्हणाले- ग्रामीण भागातील नेता कृषी खाते चांगले सांभाळू शकतो

भाजप आणि शिंदे गटासोबत सत्ता स्थापनेनंतर अजित पवारांनी मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला होता. ते म्हणाले की हे एक महत्त्वाचे खाते आहे आणि तुम्ही उत्तम करू शकता. मात्र मी स्पष्टपणे सांगितले की माझे राजकारण मुंबई आणि शहरी भागात घडले आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित बारकावे समजून घेण्यासाठी ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला ही जबाबदारी द्यावी, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मात्र कृषी खात्याचा कारभार प्रभावीपणे पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या जाण असण्याची गरज असते. त्यामुळे आता ही जबाबदारी भरणे मामांकडे देण्यात आली आहे, हे योग्यच आहे. ते या खात्याला निश्चितच न्याय देतील. ग्रामीण भागातील माणूस पदाला न्याय देऊ शकेल छगन भुजबळ म्हणाले की, मी शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो, पण त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता भरणे मामा या पदाला न्याय देतील.बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो. भरणे मामा यांना कोणतीही अडचण येईल, असे वाटत नाही. प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं आणि आपण कसं काम करतो, यावर ते अवलंबून असते. माणिकराव कोकाटे यांची अखेर उचलबांगडी राज्य विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषि मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार कोकाटेंकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, अजित पवारांनी यावेळी स्वतः कोकाटेंची उचलबांगडी केली. त्यामुळे या कारवाईचे श्रेय फडणवीसांकडे न जाता त्यांच्याचकडे राहिले.

Aug 2, 2025 - 06:21
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow