जायकवाडी जलपूजनावरून जलसंपदा मंत्री विखे यांच्यावर काँग्रेसकडून टीका

जायकवाडी धरण नैसर्गिकरित्या शंभर टक्के भरत असताना जलपूजनासाठी आलेल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. जायकवाडीला पाणी येऊ नये म्हणून कोर्टात गेलेल्या व्यक्तीच्या हस्ते जलपूजन होणे हे मराठवाड्याचे दुर्दैव असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अनिल पटेल यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना पटेल यांनी आरोप केला की, धरणावर सध्या सुरू असलेली शंभर कोटींची कामे विखे यांच्या कंपनीची आहेत. जलपूजनाच्या नावाखाली विखे स्वतःच्या कंपनीची कामे पाहण्यासाठी आले आहेत. कालवा दुरुस्तीच्या कामासाठी निधीची मागणी केली असली तरी त्याचे टेंडर विखे यांच्या जवळच्या व्यक्तीला देण्याची तयारी सुरू आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा पाणीप्रश्न जायकवाडीवर अवलंबून आहे. दुष्काळाच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील काही संस्था आणि विखे यांनी या धरणातील पाण्याला विरोध केला होता. आता मात्र तेच जलपूजनासाठी येत आहेत, हे दुहेरी धोरण असल्याची टीका पटेल यांनी केली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष उमेश पंडुरे, निमेश पटेल, सुभाष पटेल, गुलदात पठाण, गणेश शिंदे, गौरव आठवले, किरण जाधव, दिनेश माळवे, अमित पटेल, दिलीप सनवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी गप्प का? ः पैठण शहरातील नाल्यांची सफाई आणि इतर प्रश्नांवर काँग्रेसने लढा दिला. मात्र सध्या शहरात मोठ्या समस्या असूनही लोकप्रतिनिधी गप्प आहेत, असे पटेल म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Aug 2, 2025 - 21:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow