वणी बसस्थानकाच्या छताला गळती, आवारातूनच खासगी प्रवासी वाहतूक:अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे महामंडळाचे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसौय‎

वणी येथील मध्यवर्ती बसस्थानक पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. स्थानकात ठीक ठिकाणी छताला लिकेज असून आवारात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खासगी प्रवासी वाहतूक करणारे आवारातच गाडी उभी करून प्रवासी भरत असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही होत आहे. बसस्थानकावरून रोज १३४ महाराष्ट्र, गुजरात राज्यात १६ बसेस फेऱ्या होतात. सहा प्लॅटफॉर्म त्यासाठी बनविलेले आहेत. साधारण सात ते आठ हजार प्रवासी ये-जा करतात. यात्रा उत्सव काळात हा आकडा लाखाच्या जवळपास जातो. त्यामुळे स्थानकात नेहमी गर्दी असते. गेल्या कित्येक वर्षांपासून आवाराचे डांबरीकरण अथवा काँक्रेटीकरण झाले नसल्याने खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लांबून प्रवास करून आलेल्या आणि सीटवर झोपलेल्या प्रवाशांना कंडक्टरने वणी आले आहे, हे सांगायची गरजच पडत नाही. स्थानकात बस येताच मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जाग येते. साधारण चार ते पाच फुटापर्यंत रुंद खड्डे असल्याने चालकाला खड्डा चुकविणेदेखील अशक्य होते. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी साधे मुरुमदेखील टाकला जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसौय होत आहे. गेल्या वर्षी रंग रंगोटी केलेल्या भिंतीवरील छताचे पाणी गळत असल्याने रंग उडाला आहे. बसस्थानकात इतर सुविधांचाही वणवा आहे. स्वच्छता गृह लांब असल्याने रात्री अंधारात जाण्याची भीती वाटते. राज्य तसेच लगतच्या राज्यातील बसेस येथे येत अूसूनही बसस्थानकात कायम अंधार असतो. ^ राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वणी बसस्थानकाच्या समस्येबाबत वारंवार सांगूनदेखील ते याकडे दुर्लक्ष करत आहे. दिवसेंदिवस वणी बसस्थानकाची दुरवस्था होत आहे. स्थानकाचे बांधकाम जुने असल्याने काही अघटित घडण्याअगोदर या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही घडले तर अधिकारीच जबाबदार राहतील. - विजय बर्डे, ग्रामपंचायत सदस्य गाळ्यांची दुरुस्थी करण्याची मागणी बसस्थानकात जवळपास सात गाळे महामंडळाचे असून त्यापैकी तीन भाडे तत्वार दिले आहे. तर बाकी ओस पडले आहे. या गाळ्यांचे छत गळत असल्याने पावसाचे पाणी आत येते. हे गाळे बेरोजगार युवकांना भाड्याने दिल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल, त्यामुळे गाळ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Aug 2, 2025 - 21:26
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow