झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही आता काळाची गरज:तहसीलदार सुरेश कव्हळे

प्रतिनिधी | बोरगाव मंजू ‘झाडे लावणे आणि जगवणे ही काळाची गरज आहे आपल्याला कोरोनासारख्या महामारीमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हता. आपल्याला फुकट ऑक्सिजन मिळत असल्याने आपल्याला त्याची किंमत नव्हती. त्यामुळे झाडे लावणे आणि जगवणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला कोरोनासारख्या महामारीने दाखवून दिले आहे. म्हणून झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही सध्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी येथे केले. बोरगाव मंजू येथे राजस्व अभियानांतर्गत आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणंद रस्त्यावर वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमांमध्ये तहसीलदार कव्हळे बोलत होते. बोरगाव मंजूचे महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी हरिहर निमकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव म्हणजे येथे जुना कानशिवनी रस्ता या शेत रस्त्याच्या पाणंद रस्त्यावर दोन्हीकडे खड्डे करून शेकडो झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये मंडळ अधिकारी नंदकिशोर माहोरे तलाठी सुनील कल्ले, पुरुषोत्तम गायकवाड, प्रवीण चव्हाण, अंजली इंगोले,अर्चना चव्हाण, सुनिता दातकर ,संघमित्रा सदाशिव राधा राठोड ,संतोष ठाकूर ,अमोल कुंभारे ,यांच्यासह गावातील सर्व पक्षाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच गावकऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला. तसेच ४ ऑगस्ट ला परशुराम नाईक विद्यालयामध्ये होणाऱ्या राजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले तसेच संजय गांधी निराधार ,आधार कार्ड अशा विविध प्रकारच्या योजनांची माहिती देऊन आपल्याला त्वरित दाखले तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या सुवर्णसंधीचा बोरगाव मंजू परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.

Aug 4, 2025 - 12:24
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow