महसूल सप्ताह निमित्त फुलंब्री तालुक्यात सामाजिक उपक्रम:विद्यार्थ्यांनी जाणून घेतली कामकाजाची माहिती

प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री महसूल विभागाच्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह उपवागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनखाली साजरा करण्यात येत असून यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. महसूल दिन साजरा, उद्घाटन सोहळा, ऑगस्ट उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, पाणंद व शिवार रस्त्यांची मोजणी व अडथळे दूर करण्याची कार्यवाही, वारस सहाय योजनांतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून DBT अंतर्गत अनुदान वितरण, छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसुधारणा अभियानाअंतर्गत विविध ठिकाणी शिबिरे,शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे व अतिक्रमणमुक्तीबाबत निर्णय घेणे,विवीध धोरणाची अंमलबजावणी, महसूल सप्ताहाचा समारोप आणि अहवाल सादरीकरण असा महसूल सप्ताह फुलंब्री तालुक्यात साजरा होणार आहे. यामध्ये शनिवार रोजी कर्मचारी यांनी कार्यालयीन स्वच्छता करण्यात आली. तसेच समता विद्या मंदिर फुलंब्री येथील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय येथे भेट दिली व तहसील कार्यालयीन पद्धत समजावून घेतली. तहसीलदार योगिता खटावकर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे संजीव राऊत नायब तहसीलदार, शेख शफीक अव्वल कारकून, वैष्णव महसूल सहायक, गणेश शिंदे शिपाई, कारभारी कवाळे कोतवाल सत्कार करण्यात आला. महसूल सजा गेवराई पायगा अंतर्गत निमखेडा येथील स्मशानभूमी मध्ये कदम नावाचे झाडे लावून, झाड संगोपनाची जबाबदारी सरपंच यांना सोपवण्यात आली. शिरोडी खुर्द येथे अॅग्रीस्टीक बाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी महसूल विभागाच्या वतीने समजावून घेण्यात आला. या विविध ठिकाणी तहसीलदार योगिता खटावकर, नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्यासह शालेय विद्यार्थी शिक्षक महसूल कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Aug 4, 2025 - 12:25
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow