मराठवाड्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3हजार रुग्णांना 25 कोटी रुपयांची मदत:आरोग्य शिबिराचाही 12 हजार रुग्णांनी घेतला लाभ, सर्वाधिक रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष दिलासा दायक ठरला असून या कक्षाद्वारे जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल 3 हजार रुग्णांना 25.58 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. या शिवाय जिल्हास्तरावर आयोजित शिबिराचा 12 हजार रुग्णांना लाभ मिळाला असून यामध्ये सर्वाधिक 3 हजार 625 रुग्ण हिंगोली जिल्ह्यातील आहेत. राज्यात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. याशिवाय जिल्हास्तरावर आरोग्य शिबीरे आयोजित करून या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात दाखल होणाऱ्या प्रस्तावाची शासनाकडे माहिती सादर केल्यानंतर रुग्णांना मदत केली जाते. यामध्ये मराठवाड्यात जानेवारी ते जून या कालावधीत 3 हजार रुग्णांना 25.58 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 633 रुग्णांना 5.33 कोटी, बीड 610 रुग्णांना 4.89 कोटी, परभणी 533 रुग्णांना 4.67 कोटी, लातूर 385 रुग्णांना 3.39 कोटी, जालना 367 रुग्णांना 3.11 कोटी, नांदेड 323 रुग्णांना 2.80 कोटी, धाराशिव 257 रुग्णांना 2.21 कोटी तर हिंगोली जिल्हयातील 132 रुग्णांना 1.16 कोटी रुपयांची वैद्यकिय मदत करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून आयोजित आरोग्य शिबीराचा 12 हजार रुग्णांना लाभ घेतला असून यामध्ये सर्वाधिक हिंगोली जिल्ह्यातील 3625 रुग्णांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर 3058, लातुर 2522, बीड 1100, परभणी 763, धाराशिव 742, जालना 373, नांदेड जिल्ह्यातील 226 रुग्णांचा समावेश आहे. 20 गंभीर आजारासाठी मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 20 गंभीर आजारासाठी मदत दिली जात असून यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, किडणी, लिव्हर, बोनमॅरो प्रत्यारोपन, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायलिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघातातील रुग्णांचा समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत उपचार शक्य नसतील तर त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे मदत मागता येते. या कागदपत्रांची असणार आवश्‍यकता रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुग्णांचे आधार कार्ड, शिधापत्रिका, 1.60 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले प्रमाणपत्र, वैद्यकिय खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्णालयाची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर नोंद असावी.

Aug 6, 2025 - 14:36
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow