परभणीचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला:बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश; पंजावर जनतेचा विश्वास कायम असल्याचा केला दावा

परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे 7 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. "काँग्रेस हा सर्व धर्म आणि जातींच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे. सध्या देशात भाजप विरोधात लढणारा प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसच उभा आहे. काही नेते जरी पक्ष सोडत असले तरी जनतेचा आणि मतदारांचा विश्वास काँग्रेसवर कायम आहे," असे दुर्राणी यांनी 'दिव्य मराठी डिजिटल'शी बोलताना सांगितले. दुर्राणी यांचा प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण 2004 मध्ये विधानसभा 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. बाबाजानी दुर्राणी पुढे बोलताना म्हणाले की, अनेक नेते पक्ष सोडत आहेत पण कार्यकर्ते हे काँग्रेस विचारसरणीला सोडून कुठेही गेलेले नाहीत. नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते हे वैचारिक लढाई लढत आहे. आज जरी पक्षाची स्थिती खराब असली तरी आगामी निवडणुकीत जिल्हाभरात काँग्रेसचा विचार पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत. गेली काही दिवस दुर्राणी अजित पवारांसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. पक्ष-संघटनेसाठी काम करणार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, विधानसभेच्या निवडणूक आताच झाली असली तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा झेंडा गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. यानंतर कार्यकर्ते जसे सांगतील त्या प्रमाणे आगामी रणनीती ठरवत काम करत राहू, असे त्यांनी म्हटले आहे. कोण आहेत बाबाजानी दुर्राणी? बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून सर्वांना परिचित आहेत. परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि प्रभावी नेते मानले जातात. 2004 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर 2012 आणि 2018 या दोन्ही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर दुर्राणी यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला, मात्र तिथे त्यांना अपेक्षित स्थान मिळाले नाही. परिणामी, त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. आता मात्र दुर्राणी यांनी शरद पवार यांचीही साथ सोडत थेट काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परभणी काँग्रेसमध्ये सध्या निर्माण झालेली नेत्यांची पोकळी त्यांच्या प्रवेशामुळे भरून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ते पुन्हा अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र कोणत्याही सत्ताधारी गटात न जाता त्यांनी थेट काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे.

Aug 5, 2025 - 16:51
 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow