पुनर्वसनाची व्यवस्था करा, तोपर्यंत कारवाई नको:फुलंब्रीतील अतिक्रमण कारवाईविरोधात निवेदन
प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री शहरातील अतिक्रमित व्यापाऱ्यांनी "व्यापारी एकता बचाव समिती’ स्थापन केली असून, प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाईविरोधात ही समिती तयार करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, व्यापारी अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असलेल्या जागेवर अचानक अतिक्रमणाची कारवाई करणे अन्यायकारक आहे. शासनाने पुनर्वसनाची योग्य व्यवस्था केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने निवेदनाची गंभीर दखल घ्यावी. तातडीने तोडगा काढावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी एकता बचाव समितीने दिला आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, समितीचे अध्यक्ष सदाशिव तावडे, सचिव कौतिक भोपळे, उपाध्यक्ष सुधाकर ठोंबरे, सय्यद रज्जाक, इरफान रऊत पठाण, मोबीन गुलाब शहा, कार्याध्यक्ष वाहेद पठाण, संजय गांधी, राजेंद्र सावजी, मोबीन पाशा, शरफरोद्दिन दलिलोद्दीन काझी आदी उपस्थित होते. संबंधितांनी आमच्या निवेदनातील मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असाही इशाराही देण्यात आला. फुलंब्री ः निवेदन देताना अतिक्रमण बचाव समितीचे व्यापारी दिसत आहेत.

What's Your Reaction?






